शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 16:27 IST

नाशिक- शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्युहरचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला.

ठळक मुद्देमहापालिकेत निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांपैकी अवघे पाच जण उपस्थित नगरसेवकांना बोलाविलेच नसल्याचा दावा

नाशिक- शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्युहरचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला. उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख असलेल्या खासदार संजय राऊत यांनी सदरची बैठक बोलावली होती मात्र, त्यांनी पत्रकार परिषदेत सारवा सारव करताना बैठकीस नगरसेवकांना बोलाविलेच नसल्याचे सांगत शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला. दुसरीकडे पक्षातील काही जण हे माध्यमांना हाताशी धरून पक्षाच्या विरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप केल्याने गटबाजीला त्यांच्याकडूनच अप्रत्यक्षरीत्या पुष्टीही मिळाली.खासदार राऊत यांच्या दौऱ्याचे निमंत्रण देतानाच शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे व नविन पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे व्हॉटस अ‍ॅप संदेशात नमुद करण्यात आले होते. माध्यमांना देखील हीच माहिती देण्यात आली होती. तथापि, बुधवारी (दि. २५) मात्र खासदार राऊत यांनी नगरसेवकांना बोलविलेच नसल्याचा दावा केल्याने नगरसेवक हे लोकप्रतिनिधी नव्हेत काय असाही प्रश्न शिवसेनेतूनच केला जात आहे. सदरच्या बैठकीसाठी मंगळवारी नगरसेवकांना दूरध्वनी करण्यात आले, त्याच वेळी नगरसेवकांच्या नाराजीमुळे ते बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आणि प्रत्यक्षात घडलेही तसेच बुधवारी (दि.२५) सकाळी झालेल्या बैठकीस महापालिकेत निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांपैकी अवघे पाच जण उपस्थित होते, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे दुपारी खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी याविषयावरून विचारणा केल्यानंतर त्यांनी ही नगरसेवकांची नव्हे तर केवळ पदाधिकाºयांची बैठक होती, असा दावा केला. विधान परिषद निवडणूकीसंदर्भात बैठक असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा मतदार संघ असतो अािण त्याचे निकषही वेगळे असतात. त्यासंदर्भात नगरसेवकांची बैठक स्वतंत्ररीतीने घेतली जाते असेही ते म्हणाले. विधान परिषदेसाठी पक्षाने नरेंद्र दराडे यांची अधिकृतरीत्या घोेषणा केली ओ. सध्या पक्षाचे २१२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात आहेत. मात्र प्रत्यक्षात चारशे मते पक्षाच्या उमेदवाराला मिळतील असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिकSanjay Rautसंजय राऊत