शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकाची दानवेंकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:26 IST

येथील भाजपा नगरसेवकांच्या गाड्यांची मोडतोड करणारा भाजपातील माजी नगरसेवक यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक सतीश सोनवणे व नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिले असून, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिल्याचे समजते.

इंदिरानगर : येथील भाजपा नगरसेवकांच्या गाड्यांची मोडतोड करणारा भाजपातील माजी नगरसेवक यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक सतीश सोनवणे व नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिले असून, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिल्याचे समजते.  ५ एप्रिल रोजी मध्यरात्री काही टवाळखोरांनी दुचाकीवरून येऊन नगरसेवक सतीश सोनवणे व डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या गाड्यांची मोडतोड केली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. यात चौघा जणांचा सहभाग असल्याचे पहिल्या दिवशीपासूनच ाोलिसांना लक्षात आले होते. त्यानुसार पोलिसांनी दोनच दिवसांत यातील दोघा अल्पवयींनांसह एकास ताब्यात घेतले होते. मात्र यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी वाढतच असल्याने पोलिसांनी काही तासांतच यातील मुख्य संशयित प्रितम गोडसे ऊर्फ डॅनी यास ताब्यात घेतले होते. डॅनी याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हे काम करण्याची सुपारी नगरसेवक सुप्रिया खोडे यांचे पती माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी दिली असल्याचे सांगितले होते.  पोलिसांनी खोडे यांचा तपास सुरू केल्याचे समजातच खोडे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी खोडे यांनी विकासकामांच्या कामावरून हा गुन्हा केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे या प्रकाराला श्रेयवादाची लढाई म्हणून बघितले जाऊ लागले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही याबाबत कोणतीही पावले न उचलल्यामुळे अखेरीस आज नगरसेवक सोनवणे व कुलकर्णी यांनी नाशिक दौºयावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन व सर्व दैनिकांतील बातम्यांचे कात्रण तसेच सोशल मीडियावरील संदेशांबाबत माहिती दिली. खोडे यांच्यावर कारवाई न केल्यास भविष्यात इंदिरानगरमधून पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे खोडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकाराने पक्षाची बदनामी होत असल्याचेही सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप,  देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी उपस्थित होते.  इंदिरानगरमध्ये भाजपातीलच माजी नगरसेवकाने भाजपाच्याच नगरसेवकांच्या गाड्यांवर हल्ला केल्यानंतरही पक्षातील स्थानिक पदाधिकायांनी कोणतीही कारवाई न केल्याने आज या दोन्ही नगरसेवकांनी थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. आता प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात या प्रकरणाचा चेंडू असून, ते यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BJPभाजपा