शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:55 IST

महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे काम सुरू झाले आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे काम सुरू झाले आहे.नाशिक शहरात दर पावसाळ्यात धोकादायक घरांचा प्रश्न उभा राहातो. पावसाळ्यात नाशिक आणि पंचवटी गावठाणातील जुने वाडे भिजतात आणि त्यानंतर काही वाड्यांचा भाग कोसळतो तर काही वेळा संपूर्ण वाडेच खाली येतात. गेल्या वर्षी सुमारे पंचवीस ते तीस वाडे पडले होते आणि त्यात दोन जणांचे बळी गेले होते तर एक दोन ठिकाणी वाडे पडल्याने संबंधित वाड्यातील नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने संबंधितांना घरे रिकामी करून अन्यत्र स्थलांतरासाठी नोटिसा बजावून पोलिसांचीदेखील मदत घेतली होती. घर मालक आणि भाडे करू वादात अनेक धोकादायक वाड्यांचा पुनर्विकास होऊ शकला नाही. याठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याची तयारी असली तरी अद्याप ती प्रशासकीय लालफितीत आहेत. गेल्या वर्षी हा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी यंदा लॉकडाउनमुळे महापालिकेचा मूल्यमापन अहवाल रखडला आहे. यासंदर्भात, गेल्या आठवड्यात लोकमतने ‘क्लस्टर वाºयावर, वाडे पडण्यावर’ हे वृत्त देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.दरम्यान आता प्रशासनाने धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यानुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे आढळून आले आहेत. त्यातील निम्या मिळकती अती धोकादायक आहेत. या सर्वांना नोटिसा बजावण्यासाठी नगररचना विभागाने ७०८ नोटिसा तयार करून विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविल्या असून, त्या संबंधितांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. तथापि, यानंतरदेखील नागरिक स्थलांतरित होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.काझी गडीवर ११४ धोकादायक घरेमहापालिकेच्या सर्वेक्षणानुसार ७२३ धोकादायक घरे आहेत यात नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक २६०, नाशिक पश्चिम मध्ये १९२, पंचवटीत १७५, सिडको विभागात १९, नाशिकरोड विभागात साठ आणि सातपूर विभागातील सतरा घरांचा समावेश आहे. यात पूर्व विभागातील सर्वाधिक २६० घरांमध्ये काझी गढीवरील ११४ धोकादायक घरांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर