शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मोठा दिलासा! बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पट; उपचारार्थी रुग्णसंख्येतही होतेय घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:31 IST

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २) एकूण १०८६ नवीन रुग्ण बाधित झाले असून, २३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ...

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २) एकूण १०८६ नवीन रुग्ण बाधित झाले असून, २३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण ६ बाधितांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८२४वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या गत तीन दिवस सातत्याने कोरोनामुक्तपेक्षा कमी राहात असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच उपचारार्थी रुग्णसंख्येतही सातत्याने घट येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या १२ हजार १४२वर पोहोचली आहे.

नाशिक मनपा क्षेत्रातील ७९४३, नाशिक ग्रामीणचे ३८०९, मालेगाव मनपाचे १६८, तर जिल्हाबाह्य २२२ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या १४७६ वर पोहोचली आहे. त्यात ११९७ अहवाल नाशिक ग्रामीणचे, १५६ नाशिक मनपाचे, १२३ मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत, तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट २२.४१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यात नाशिक मनपाचे २६.७१ टक्के, नाशिक ग्रामीणचे १३.४० टक्के, मालेगाव मनपाचे १२.९६ टक्के, जिल्हा बाह्यचे ५२.१७ टक्के असा आहे, तर जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेच्या दरात अल्पशी वाढ होऊन ते प्रमाण ९५.५३ टक्के झाले आहे. त्यात नाशिक मनपा ९५.५५ टक्के, नाशिक ग्रामीण ९५.३५ टक्के, मालेगाव मनपा ९६.१६ टक्के, जिल्हाबाह्य ९५.५९ टक्के इतके आहे.

आठवडाभर सातत्याने मृत्यू वाढ

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापर्यंत एक किंवा दोन इतकीच रोजची मृत्युसंख्या होती. मात्र, २७ जानेवारीपासून त्यात वाढ होऊन ती संख्या सातत्याने ५च्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक राहिली आहे. अशा परिस्थितीत आता बळींच्या संख्येला अटकाव करणे हेच प्रशासनापुढील मुख्य आव्हान आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस