शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३२ बळींसह कोरोनाचा उच्चांंक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:40 IST

कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ३२ बळींची नोंद झाली असून, गतवर्षाच्या सर्वाधिक बळींपेक्षाही हा आकडा दोनने अधिक आहे. दरम्यान, बाधित संख्येने ४,६३८ पर्यंत मजल मारली असून, एकूण ३,१९१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

ठळक मुद्देहतबल : कोरोनाच्या उद्रेकापासून एकाच दिवसातील सर्वाधिक मृत्यू

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ३२ बळींची नोंद झाली असून, गतवर्षाच्या सर्वाधिक बळींपेक्षाही हा आकडा दोनने अधिक आहे. दरम्यान, बाधित संख्येने ४,६३८ पर्यंत मजल मारली असून, एकूण ३,१९१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,८९४, तर नाशिक ग्रामीणला १,५४३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११९ व जिल्हाबाह्य ८२ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला १६, तर मालेगावला ३ आणि जिल्हाबाह्य २, असा एकूण ३२ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. गतवर्षापेक्षा २ अधिक जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या बरोबरीने मृत्यूदराचीही वाटचाल उच्चांकाकडे होऊ लागली आहे.  गतवर्षी ६ ऑगस्टला ३० तर १६ सप्टेंबरला २९ इतक्या सर्वोच्च बळींची नोंद जिल्ह्यात झाली होती. मात्र, गतवर्षीच्या सर्वाधिक बळींपेक्षाही २ अधिक बळी मंगळवारी नोंदले गेल्याने ही बळींची वाढच जिल्ह्यासाठी घातक ठरण्याची चिन्हे आहेत.  दरम्यान, प्रलंबित अहवालाची संख्या पुन्हा एकदा सहा हजारांवर अर्थात ६,७९२ वर पोहोचली आहे.ग्रामीणचे बळी शहरापेक्षा अधिक जिल्ह्यातील ३२ बळींपैकी तब्बल निम्मे म्हणजे १६ बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरू झाल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावरदेखील अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूण मृत्यूसंख्या अडीच हजाराचा आकडा ओलांडून २,५२९ पर्यंत पोहोचली आहे. 

उपचारार्थी ३२ हजारांवर जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक स्तरावर असून, सध्या ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात १९ हजार २५६, नाशिक ग्रामीणला १० हजार ५२७, मालेगाव मनपाला २,१३४ तर जिल्हाबाह्य २५१ रुग्णांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या