शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जिल्ह्यात लोकसहभागातून ‘कोरोनामुक्त गाव अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:32 IST

कोरोनाचा  ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व  ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावपातळीवर उपाययोजना

सायखेडा : कोरोनाचा  ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व  ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गटविकास अधिकारी यांच्यासह  जवळपास १४०० ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्याशी नुकताच संवाद साधला. त्यानुसार ग्रामीण भागात क्षेत्रीय पातळीवर कामाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्राची आखणी, प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांची देखरेख याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. लोकसहभाग वाढवून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अनेक गावात स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गावातच लक्ष देऊन नियोजन केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही गावांमध्ये १०० वर रुग्ण होते. ही संख्या १० च्या खाली आणण्यात यामुळे यश आले आहे. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात खाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने दबाव वाढता आहे. अनेक लोक गृह विलगीकरणात न थांबता बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना गावात संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. या माध्यमातून ग्रामीण आरोग्य केंद्राशी संबंधित कर्मचारी योग्य काळजी घेऊन घरोघरी न जाता एका जागेवर सेवा देणे शक्य होत  आहे.अनेकजण राहून घरामध्ये लक्षणे लपवून ठेवणे, वेळेवर उपचार न करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे नियोजन करून संबंधितांची योग्य उपचार, घरगुती आहार याबाबत नियोजन  केले जात आहे. त्यामुळे किमान १० दिवस रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात थांबून कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॉटस्पॉट गावांवर विशेष लक्षnहॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये ४५ वयोगटावरील १०० टक्के नागरिकांच्या लसीकरणावर भर. nरुग्णांसाठी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था. nरुग्ण आढळून आल्यास कंटेनमेंट झोन तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या