शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य नागरिकांना १० मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:11 IST

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असताना नाशिक जिल्ह्यात गेल्या १० तारखेपासून बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून आरोग्य नियमांचे पालनच होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण दहा मार्चपासून सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

ठळक मुद्देभुजबळ यांचे सूतोवाच बाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता खासगी लॅबची तपासणी होणार

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असताना नाशिक जिल्ह्यात गेल्या १० तारखेपासून बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून आरोग्य नियमांचे पालनच होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण दहा मार्चपासून सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील काेरोना स्थितीचा आढावा शनिवारी (दि.१३) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये शासकीय लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली तर त्यात बाधित असल्याचे अहवालाची सरासरी ५ ते ७ टक्के आहे. मात्र, खासगी लॅबमध्ये हीच सरासरी २८ टक्के इतकी आहे. म्हणजेच खासगी लॅबमध्ये बाधित असल्याचे प्रमाण अधिक आढळते आहे. त्यामुळे यासंदर्भातदेखील अभ्यास करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले. ज्या रुग्णांचे नमुने खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आहेत, त्यांची शासकीय लॅबमध्येदेखील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना नियंत्रणात आला असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र, आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असून सरासरी शंभर बाधित आढळू लागले आहेत. नाशिकच नव्हे तर मुंबई आणि नागपूर अन्य शहरातदेखील बाधितांची सं‌ख्या वाढत आहे. विदेशातही पुन्हा लॉकडाऊन होत आहे. तशी वेळ येऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याचे आवश्यक आहे, परंतु सध्या लग्नसोहळे किंवा हॉटेलमध्ये गर्दी करताना अशा प्रकारच्या नियमांचे पालन आढळत नाहीत असेही भुजबळ म्हणाले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसChagan Bhujbalछगन भुजबळHealthआरोग्य