शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची लस येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:25 IST

कोरोनावर प्रभावी लस  शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, सध्या त्याची चाचणी सुरू असली तरी, नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मार्च महिन्यात सदरची लस उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देजिल्ह्याचा आराखडा तयार : ३२ हजारांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

नाशिक : कोरोनावर प्रभावी लस  शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, सध्या त्याची चाचणी सुरू असली तरी, नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मार्च महिन्यात सदरची लस उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर अन्य घटकांसाठी लस उपलब्ध असेल असेही ते म्हणाले. कोरोनावर देशात व विदेशातही लस उपलब्ध झाली असली तरी, राज्यात कोणत्या कंपनीची लस मिळेल हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, लस उपलब्ध झाल्यास त्याचे तत्काळ लसीकरण करण्याची संपूर्ण तयारी शासनाने आरोग्य खात्याकडून करून घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाकडून प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याने प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्याच बरोबर खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहितीदेखील संकलित करून ती शासनास पाठविण्यात आली असून, नाशिक व मालेगाव महापालिका असे सर्व मिळून जवळपास ३२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही लस उपलब्ध  होईल. सध्या लसीची चाचणी सुरू असल्याने जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ती उपलब्ध होण्याची शक्यताही आहेर यांनी व्यक्त केली. साइड इफेक्ट रोखण्यासाठी घेणार दक्षतालसीच्या साइड इफेक्ट व जनतेत त्याविषयीची असलेली भीती निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यास त्याची काही प्रमाणात रिॲक्शन येतेच. त्यामुळे कोरोना लसीच्या बाबतीत तसे झाल्यास त्यासाठी पुरेपूर काळजी घेण्याची तयारी करण्यात आलेली असून, लसीकरणाच्या ठिकाणी रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. लस दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ३० मिनिटे तेथेच थांबवून ठेवून त्यावर लक्ष ठेवण्यात येईल व त्यानंतरच बाहेर जाऊ देण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य