शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संशयिताचा पळून जाताना ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:02 IST

बाधिताच्या संपर्कातील एका संशयित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातातून निसटून एका नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकवरुन पळून जाण्यासाठी तो किक मारत असतानाच त्याचे ह्दयविकाराने निधन झाले. त्याचे निधन कोरोनाच्या धसक्याने झाले असण्याची शक्यता गृहित धरुन मनपाच्या वतीने कोरोनाला घाबरुन न जाण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना घाबरु नये असे आवाहनमहापालिकेच्या वतीने पुढाकार

नाशिक: बाधिताच्या संपर्कातील एका संशयित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातातून निसटून एका नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकवरुन पळून जाण्यासाठी तो किक मारत असतानाच त्याचे ह्दयविकाराने निधन झाले. त्याचे निधन कोरोनाच्या धसक्याने झाले असण्याची शक्यता गृहित धरुन मनपाच्या वतीने कोरोनाला घाबरुन न जाण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.वडाळा नाका येथील ५५ वर्ष वयाचा पुरु ष बाधित रु ग्णाच्या संपर्कातील असल्याकारणाने समाज कल्याण वसतिगृह या केअर सेंटरमध्ये ४ जुलैला भरती करण्यात आले होते. ५ जुलैला त्यांचा तपासणी नमुना घेण्यात येणार होता. या रु ग्णास कुठलाही प्रकारचा त्रास होत नव्हता. परंतु त्याने मला खाजगी हॉस्पिटलला जायचे असल्याचे म्हणताना कोणता ते सांगितले नाही. त्यामुळे झाकीर हुसेन रूग्णालयात नेण्याकरता अथवा त्याच्या आवडीच्या रूग्णालयात पाठविणे करता त्याला अ‍ॅम्बुलन्स मध्ये बसविण्यात आले. अ‍ॅम्ब्युलन्स सुरू होताच त्याने दरवाजा उघडून पळ काढला व स्वत:च्या मोटरसायकलला किक मारून पळून जाऊ लागला. त्याच वेळेस या व्यक्तीस हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तो तेथेच कोसळला. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब बघून अ‍ॅम्ब्युलन्समधून जाकिर हुसेन रु ग्णालयात घेऊन आले. परंतु तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले . संबंधित मृत व्यक्तीस शवविच्छेदन करीता सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या