शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला झोपडपट्ट्यांना कोरोनाचा बसतोय विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:37 IST

नाशिक : नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे.

नाशिक : नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे.महापालिका हद्दीत कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे, तर महापालिका प्रशासनाकडून संबंधित परिसरात उपायोजना केल्या जात आहेत. गावठाण आणि लहान-मोठ्या वसाहतींचा हा परिसर काही ठिकाणी अत्यंत दाट लोकवस्तीचा आहे. अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुलाबवाडी, देवळालीगाव, राजवाडा, विहितगाव, गोसावीवाडी, रोकडोबावाडी तसेच गोरेवाडीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये काहीशी भीती आहे. एखाद्या कुटुंबात रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे, तर काही ठिकाणी मुंबई, पुण्याहून आलेल्या नातेवाइकांमुळेदेखील काहींना कोरोनाची बाधा झालेली आहे. बाहेरील व्यक्तीच्या संसर्गातील संपूर्ण माहिती अद्यापही समोर आलेली नससल्याने त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे बोलले जात आहे.गोसावीवाडी ही अत्यंत दाट लोकवस्तीची झोपडपट्टी असून, मुख्य रस्त्यालगत असल्याने या परिसरात नेहमीच वर्दळ असते. गुलाबवाडी झोपडपट्टी ही मालधक्क्याजवळ असून, अनेक ट्रकचालक या ठिकाणी राहतात. येथील अनेक लोक रोजंदारीची तर महिला धुणी-भांड्यांची कामे करतात. बांधकाम, मार्केट कमिटी, भाजीपाला व्यवसाय, हमाली, पेट्रोलपंप अशी कामे कमी अधिक प्रमाणात येथील नागरिक करीत असल्यामुळे ते अधिक अनेकांच्या संपर्कात येतात. शिवाय दाट लोकवस्ती असल्यामुळे त्यांचाही इतरांना संसर्ग होतो.विशेषत: छोटी घरे असल्याने कुटुंबातील अन्य सदस्यांना लागलीच लागण होते. कोरोनाच्या या विळख्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहेच शिवाय नागरिकांनादेखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.नाशिकरोडच्या चारही बाजूंना झोपडपट्टी, छोटे-मोठे नगरे आणि जुना गावठाण परिसर आहे. वाढत्या वसाहती आणि वाहतुकीमुळे नाशिकरोडमधील वर्दळ वाढलेली दिसते. गेल्या काही दिवसांत गर्दीच्या या परिसरामध्ये कोरोनाने शिरकाव केला असून, नाशिकरोडमधील झोपडपट्टी परिसरात सातत्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसते. याचा सर्वाधिक धोका हा कुटुंबांना अधिक बसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक