शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:17 IST

यंदाच्या हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. अर्थात तरीदेखील घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार असून, कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून जमेल तसा हा सण साजरा करणेच समाजहिताचे ठरणार आहे. तेव्हाच यंदाची गुढी ही कोरोनावरील विजय मिळवणारी विजयपताका ठरेल.

ठळक मुद्देअपेक्षा : नवसंवत्सरात संकल्पाची विजयपताका

नाशिक : यंदाच्या हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. अर्थात तरीदेखील घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार असून, कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून जमेल तसा हा सण साजरा करणेच समाजहिताचे ठरणार आहे. तेव्हाच यंदाची गुढी ही कोरोनावरील विजय मिळवणारी विजयपताका ठरेल.भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा या नववर्षाच्या स्वागत सणाचे महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवसाला भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याचा प्रातिनिधिक दिन मानले जाते. त्यानुसार घराबाहेर गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत देवदर्शन करून करण्यात येते. मात्र, यंदा प्रथमच काळाराम किंवा भद्रकाली देवी या ग्रामदैवतांच्या दर्शनाविना भाविकांना नूतन संवत्सरास प्रारंभ करावा लागणार आहे. ही गुढी स्नेहाची, मांगल्याची आणि आनंदाची प्रतीक मानली जाते. प्रत्येक नववर्ष हे आपल्यासह कुटुंबाला भरभराटीचे जावो, हाच संकल्प असतो. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर स्टीलचा, तांबे, पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. येत्या आठवडाभरात नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दिशेने खबरदारी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. यंदा सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली असून, मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाची मुभा नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून एकमेकांना शुभेच्छा संदेश देत गुढीपाडवा साजरा करणेच समाजाच्या हिताचे ठरणार आहे.गुढी उभारणीसाठीचे मुहूर्तगुढी उभारणीसाठी बुधवारी सकाळी ६.३० ते ८ यादरम्यान लाभ मुहूर्त तर ८ ते ९.३० दरम्यान अमृत मुहूर्त आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १२.१५ या वेळेत शुभ मुहूर्त आहे. मात्र परंपरेनुसार सकाळच्या वेळेत गुढी उभारून घ्यावी. - प्रदीप बोरकर, गुरुजी

टॅग्स :Nashikनाशिकgudhi padwaगुढीपाडवा