शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना युद्धात देवदूत बनून धावते ‘१०८’

By अझहर शेख | Updated: April 24, 2020 23:43 IST

नाशिक : कोरोनाविरोधातील युद्धात जसे डॉक्टर, पोलीस, परिचरिकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, अगदी तशीच भूमिका शासनाच्या आपत्कालीन मोफत वैद्यकीय सुविधेअंतर्गत सतत ‘आॅन रोड’ धावणाऱ्या ‘१०८’ मदत वाहिनीच्या रुग्णवाहिकाचालकांची व त्यावरील डॉक्टरांचीसुद्धा आहे.

अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाविरोधातील युद्धात जसे डॉक्टर, पोलीस, परिचरिकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, अगदी तशीच भूमिका शासनाच्या आपत्कालीन मोफत वैद्यकीय सुविधेअंतर्गत सतत ‘आॅन रोड’ धावणाऱ्या ‘१०८’ मदत वाहिनीच्या रुग्णवाहिकाचालकांची व त्यावरील डॉक्टरांचीसुद्धा आहे. कोरोनाचा विळखा जसा शहर व जिल्ह्याभोवती अधिकाधिक घट्ट होत गेला, तसे या कोरोना आजाराच्या रुग्णांसाठी धावणा-या शासकीय रुग्णवाहिकांची जबाबदारीही वाढली असून, आतापर्यंत तीनशेहून अधिक रुग्णांची सुरक्षित वाहतूक करण्यास ११ रुग्णवाहिकांना यश आले आहे. कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाची विविध पथके सातत्याने सर्वेक्षण करत कोरोना संशयित रुग्णांनाचा शोध घेत आहेत. तसेच आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच स्क्रिनिंग सेंटर, क्वारंटाइन सेंटरपर्यंत संशयित रुग्णांना पोहोचविणे तसेच तेथून पुन्हा रुग्णालयात घेऊन येणे अशा सर्वांत महत्त्वाचे कार्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांद्वारे केले जात आहे. शहरामध्ये दोन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नऊ अशा एकूण ११ रुग्णवाहिका या केवळ स्वतंत्ररीत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ११ रुग्णवाहिकांचे चालक, त्यावरील डॉक्टर सातत्याने या कोरोना युद्धात आॅनरोड धावत प्रत्यक्षपणे लढा देत आहेत. रुग्णवाहिका चालक त्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयापर्यंत किंवा केंद्रापर्यंत पोहोचवित असताना त्याच्या आरोग्याचीही तितकीच खबरदारी घेत असून, सोबत असलेले डॉक्टरही रुग्णांची तपासणी करताना स्वत:ची काळजी घेतात. सर्व रुग्णवाहिकांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असून, रुग्णांची हाताळणी, रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण याबाबतचे शास्रशुद्ध प्रशिक्षण रुग्णवाहिकाचालकांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.----------राज्यात अडीच हजार कोरोनाग्रस्तांना सेवाआतापर्यंत राज्यभरात १०८च्या रुग्णवाहिकांनी २ हजार ४३० कोरोना संशयित रुग्णांची वाहतूक केली आहे. यात १ हजार ५०७ रुग्ण हे त्यांची घरे, तसेच विविध ठिकाणांवरून रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर स्क्रिनिंग सेंटरमधील ९२३ जणांची रुग्णालय ते गृहस्थानबद्ध तसेच दुस-या रुग्णालयात पाठविण्याची भूमिका पार पाडली आहे.----------------सर्व रुग्णवाहिका ‘हाय अलर्ट’वरजिल्ह्यातील सर्वच रुग्णवाहिका ‘हायअलर्ट’वर असून, ७५ डॉक्टर व शंभरचालकांचा चमू कोरोनाच्या काळात गावखेड्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वात या रुग्णवाहिका कार्यरत असून, प्रशासनाकडून माहिती मिळताच रुग्णवाहिका इच्छितस्थळी धाव घेतात. मालेगाव तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे या भागात सध्या नऊपैकी किमान चार रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक