नाशिक : शहर पोलीस दलात कोरोना वाढत असून, अद्याप ३१ संशयितांपैकी २४ पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यौपकी १८ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, सात पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहर पोलीस दलातील एका कोरोना योद्धाचा बळीदेखील गेला आहे. सध्या १२ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-२ हे कोरोनाने अधिक प्रभावित झाले. इंदिरानगरमधील सात कर्मचारी कोरोनाबाधित झाले तर गुन्हे शाखा युनिट-२च्या सहा क र्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. इंदिरानगरमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाºयाचा उपचारादरम्यान, काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. कोरोनाचे संक्र मण शहरास आता सर्वत्रच वेगाने वाढत आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने आता कर्तव्यावरअसलेल्या पोलिसांचाही धोका वाढला आहे.शहरातील पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, शहर वाहतूक शाखेसह मुख्यालयातही एक किंवा दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात कोरोना वेगाने फैलावत असला तरीदेखील पोलीस दलाचे काम मात्र थांबलेले नाही. अशा स्थितीत पोलिसांनी आपल्या आरोग्याचीही विशेषकाळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.संवेदनशील भागात हवी खबरदारीसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाºया पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, विहितगाव, दसक-पंचक शिवार आदी परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तेथील नागरिकांशी कमीत कमी संपर्क कसा येईल, यादृष्टीने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. तसेच फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर, ग्लोजचा वापर अधिकाधिक करण्यावर भर दिला पाहिजे.काही पोलिसांचीही उदासीनताबंदोबस्तावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांपैकी काही पोलिसांकडून कळत नकळत खबरादारीबाबत उदासीनता दाखविली जात असल्याचे चित्र आहे. नागरिकांशी अथवा परिचयाच्या व्यक्तीशी मास्क अर्ध्यावर उतरवत संवाद साधणे, सर्रासपणे एक-दुसºयांचे मोबाइल हाताळणे, सॅनिटायझर वापराचा कंटाळा करणे अशा लहान-लहान गोष्टी पहावयास मिळत आहे. वाहतूक शाखेचे काही कर्मचारी तर रस्त्यावर कर्तव्य बजावताना केवळ एक थातूरमातूर कापडी मास्क तोंडाला लावून औपचारिकता पूर्ण करतानाही नजरेस पडतात.
शहर पोलीस दलात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:30 IST
शहर पोलीस दलात कोरोना वाढत असून, अद्याप ३१ संशयितांपैकी २४ पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यौपकी १८ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, सात पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहर पोलीस दलातील एका कोरोना योद्धाचा बळीदेखील गेला आहे. सध्या १२ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहर पोलीस दलात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण
ठळक मुद्दे१२ कर्मचारी रुग्णालयात : २४ बाधितांपैकी १८ कोरोनामुक्त