शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोना रुग्ण प्रथमच ३ हजारावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ३३३८ बाधित संख्येपर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (दि. २४) दिवसभरात तब्बल १५ बळीदेखील गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी तब्बल ३३३८ बाधित रुग्ण तर २२२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात १०, ग्रामीणला ३, मालेगाव मनपा क्षेत्रात १ तर जिल्हा बाह्य १ असा एकूण १५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२६२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने दोन ते अडीच हजारावर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इन्फो

गत बुधवारीच गाठला होता दोन हजारांचा आकडा

गत आठवड्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्याआधीच्या आठवड्यात बाधितांचा आकडा हजार ते दीड हजार होता. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा पाचशे ते सहाशेदरम्यान होता. अवघ्या दोन आठवड्यात कोरोनाने वाढीचा महाभयानक वेग गाठला आहे. गत बुधवारी २१४६ पर्यंत मजल गाठल्यानंतर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित, शनिवारी २३८३ बाधित, रविवारी २३६०, सोमवारी २७७९ तर मंगळवारी २६४४ रुग्ण बाधित आढळून आले होते. या वेगाने जिल्ह्याची वाटचाल अत्यंत भयप्रद दिशेने सुरु झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

इन्फाे

नाशिक मनपा क्षेत्रात १८४९

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १८४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. शहरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळणे महापालिका क्षेत्रासाठी भीतीदायक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातही बुधवारपासून कोरोना प्रसाराचा वेग वाढत असल्याचे ११९१ ग्रामीण बाधित आकड्यातून दिसून येत आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या संकटाने वेढल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल पुन्हा ५ हजारावर

जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात मागील दोन आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, नमुना तपासणीच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारी ही प्रलंबित अहवाल संख्या पुन्हा पाच हजारांचा टप्पा ओलांडून ५१०४ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे घडू नये ते संकट नाशिककरांनी ओढवून घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

इन्फो

सप्टेंबरनंतर मार्चमध्येच इतके बळी

कोरोना रुग्ण संख्या वाढीबरोबरच बळींची वाढती संख्या ही अधिक संकटात टाकणारी आहे. तब्बल १५ बळींचा आकडा यापूर्वी गत वर्षी सप्टेंबर महिन्यातच गेले होते. त्यामुळे हा टप्पा ओलांडणे हे जिल्ह्यासाठी भयसूचक घंटाच ठरली आहे.