कोरोनाने आयुष्यच उसवले, टाके घालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:21 PM2020-05-09T21:21:15+5:302020-05-10T00:51:32+5:30

चांदोरी : उन्हाळ्याचे दिवस आले की आनंद वाटतो. तापमान वाढत असतानाही आम्हाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. दिवस रात्र ...

 Corona made a living, how to sew? | कोरोनाने आयुष्यच उसवले, टाके घालायचे कसे?

कोरोनाने आयुष्यच उसवले, टाके घालायचे कसे?

Next

चांदोरी : उन्हाळ्याचे दिवस आले की आनंद वाटतो. तापमान वाढत असतानाही आम्हाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. दिवस रात्र एक करून या दिवसांत कामाला अधिक महत्त्व देतो. या दिवसात झालेल्या कमाईतूनच वर्षभराचा खर्च निघतो, मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. लग्न सराई निघून चालली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. कोरोनाने सारे आयुष्यच उसवले, आता टाके घालायचे कसे, असा प्रश्न टेलरिंग अर्थात शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना पडला आहे.
खेडोपाडी टेलरिंगचा व्यवसाय करणारे अनेकजण आहेत. विशेषत: असंख्य महिला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शिवण कामाचा पर्याय निवडतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. रेडीमेडच्या जमान्यात आजही बहुतांश नागरिकांचा कपडे आपल्या मनाप्रमाणे शिवून घेण्याकडे कल असतो. लग्नसराईत तर शिवणकामाला अधिक गती प्राप्त होऊन त्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाने घात केला आणि लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक संकट अधिक गडद होत गेले. विविध व्यवसाय अडचणीत सापडले. त्यातून टेलरिंग व्यवसाय सुटला नाही. गावापासून तर शहरापर्यंत सर्वच टेलर काम करणाºया कारागिरांच्या मशीन थांबल्या आहेत. कापड दुकाने बंद असल्याने टेलरिंंगच्याही दुकानावर त्याचा परिणाम झालेला आहे. अनेक कारागीर हे हातावर पोट भरणारे आहेत. कपड्यांना अल्टर करणे, पडदे शिवणे, काजे-बटण करणे, इस्त्रीकाम करणे अशा प्रकारची कामे करुन उदरनिर्वाह चालवित असतात, परंतु आता हाताला कामच नसल्याने कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा, अशा पेचात टेलरिंग काम करणारा कारागीर वर्ग सापडला आहे.
---------------------------------------
टेलरिंग व्यवसायाचा उन्हाळ्यामध्येच सीझन असतो. यावर्षी मात्र सगळंच बंद आहे. दुकान भाडे, वीजबिल, कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा असे अनेक प्रश्न पडले आहे. यासोबतच घरगुती व्यावसायिकांचे तर मोठे हाल सुरू आहे.
- मनोज वटारे, टेलर व्यावसायिक, चांदोरी

Web Title:  Corona made a living, how to sew?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक