शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

कोरोनाचा महिला प्रशिक्षणाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:26 IST

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. उत्पन्नात देखील घट झाली आहे. त्याचा फटका महापालिकेच्या महिला प्रशिक्षणाला बसला आहे. सुमारे सात कोटी रूपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात दोन कोटी रूपयांच्या वर प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि.२४) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देतरतूद दोन कोटी: लवकरच निविदा काढणार

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. उत्पन्नात देखील घट झाली आहे. त्याचा फटका महापालिकेच्या महिला प्रशिक्षणाला बसला आहे. सुमारे सात कोटी रूपयांची तरतूद असतानाप्रत्यक्षात दोन कोटी रूपयांच्या वर प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि.२४) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होत आहे, कोरोनामुळे घरपट्टी वसुलीतच सुमारे वीस कोटी रूपयांचा आत्तापर्यंत फटका बसला आहे. गेले काही महिने लॉकडाऊन काळात गृहनिर्माण क्षेत्र ठप्प होते. या सर्वाचा फटकामहापालिकेला बसला आहे. राज्य शासनाच्या कायद्यानुसार एकुण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के रक्कम महिला व बाल कल्याण विभागासाठी राखीव ठेवणे आणि त्याचा विनीयोग करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या वतीनेदरवर्षी गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी कमीत कमी दीड कोटी आणि जास्तीत जास्त दहा कोटी रूपये आत्तापर्यंत खर्च करण्यात आले आहे. यंदा अंदाजपत्रकात सात कोटी रूपयांचीतरतूद असताना देखील प्रशिक्षण दिले जात नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत समीना मेमन यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला. गेल्या चार ते पाच वर्षांपासून महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम ठप्प आहे. प्रत्येक वर्षीची तरतूद लक्षात घेतली तर किमान पंचवीस कोटी रूपये प्रशिक्षणावर खर्च झाले असते. मात्र प्रशासन महिला व बाल कल्याण विभागावर अन्याय करीत आहे. आता आठ दिवसात महिला प्रशिक्षणासाठी निविदा न काढल्यास सर्व महिला सदस्यजाऊन या विभागाला टाळे लावतील असा इशारा मेमन यांनी दिला.महापालिका आयुक्तांनी दोन कोटी रूपयांची तरतूद केली असल्याने या रकमेच्या आतच खर्च करण्यात येणार असून लवकरात त्यासंदर्भात निविदा मागविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी उपआयुक्त अर्चना तांबे यांनीदिली. यावेळी राहुल दिवे यांनी विद्युत विभागाचे वनमाळी यांच्या चौकशीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मात्र अतिरीक्त आयुक्त उपस्थित होत नसल्याने चर्चा तहकुब करण्यात आली. तर गोविंद नगर येथील नाल्यावरीलबेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कल्पना पांडे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. मात्र, नगररचना विभागातील अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. चर्चेत प्रा. शरद मोरे, प्रा. वर्षा भालेराव यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या