शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीमुळे पाथरे यात्रोत्सवाची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:39 IST

पाथरे: येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव या वर्षी बंद ठेवण्यात आला आहे. धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहे. पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या वर्षी हा यात्रोत्सव कोरोना काळ असल्याने बंद ठेवण्यात आला आहे. या काळात गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरोना संसर्ग फैलावू शकतो या कारणास्तव यात्रोत्सव बंद ठेवला आहे.

ठळक मुद्देवारेगावकर यात्रोत्सवास मुकणार : धार्मिक विधी नियमात होणार 

पाथरे: येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव या वर्षी बंद ठेवण्यात आला आहे. धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहे.

पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या वर्षी हा यात्रोत्सव कोरोना काळ असल्याने बंद ठेवण्यात आला आहे. या काळात गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरोना संसर्ग फैलावू शकतो या कारणास्तव यात्रोत्सव बंद ठेवला आहे. अनेक भाविक, भक्त यांना खंडोबा महाराज यांचे फक्त दर्शन घेता येऊ शकतात.यावेळी धार्मिक कार्यक्रम अतिशय मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शासनाने तसेच पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे. या वर्षीचा यात्रोत्सवाचा मान आवर्तन पद्धतीने वारेगाव करांना मिळणार होता. परंतु कोरोना काळामुळे हा मान मिळू शकणार नाही याची खंत वारेगावकरांना आहे. दत्त जयंती पासून सुरु होणारा हा यात्रोत्सव साधारणपणे आठवडाभर चालतो. यात्रोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना माहमारी मुळे अनेक व्यावसायिकांना याची झळ सोसावी लागणार आहे. यात्रेनिमित्त येणारे तमाशा मंडळे, रहाट पाळणे, मिठाई, खेळणी, खाऊची दुकानेवेगवेगळ्या प्रकारची दुकाने, आदींवर बंदीचा विपरीत परिणाम होऊन व्यावसायिकांचा व्यवसाय बुडणार आहे.या काळात कुस्त्यांची मोठी दंगल होत असते. यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, राज्यांमधून कुस्तीगीर येतात परंतु ग्रामीण भागातील या खेळचा आनंद घेता येणार नाही. पाथरे यात्रोत्सवाचे उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तमाशा. तमाशा शौकिनांचाही यावेळी हिरमोड होणार आहे. खंडोबा महाराजाचे मैदान वेगवेगळ्या दुकानांनी आणि गर्दीने फुलून जाते. अनेक वर्षापासून चालत असलेल्या या यात्रा उत्सव आला पहिल्यांदाच खंड पडला आहे.

     यात्रा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे छबिना, तकतराव ( देवाचा गाडा ), कावडी, डफाच्या तालावर नृत्य करणारे ग्रामस्थ, खंडोबा महाराजांच्या पादुका आणि मुकुट मिरवणूक, खंडोबा महाराज पालखी सोहळा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतात. यासाठी बाहेर गावी स्थायिक झालेले पाथरे येथील नागरिक, भक्त, भाविक,पाहुणे, नातलग, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत असतात. चालू वर्षाचा यात्रोत्सव कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने अनेक व्यवसायिक, भाविक भक्त, ग्रामस्थ या यात्रोत्सवास मुकणार आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक