शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या हद्दीवर आता 'कोरोना चेक पोस्ट'; 24 तास प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:12 IST

आजाराचा प्रसार केवळ सार्वजनिक ठिकाणच्या संसर्गामुळे वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आजारी व्यक्ती लहान मुले वयस्कर व्यक्ती यांनी आगामी पंधरा ते वीस दिवस प्रवास टाळावा.

नाशिक : कोरोना या साथीच्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शहरात येणाऱ्या रस्त्यांवर निवडणूक कालावधीत उभारल्या जाणाऱ्या 'चेक पोस्ट' प्रमाणे कोरोना तपासणी नाके कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रातील, जिल्ह्यात व शहराकडे येणारे सर्व रस्त्यांवर टीम तयार करून निवडणुकीच्या काळात ज्याप्रमाणे चेकपोस्ट तयार केले जाते तसे ‘कोरोना चेकपोस्ट’ स्थापन करून प्रवाशांची तपासणी करावी असे त्यांनी म्हटले  आहे.

ही पथके गठीत करीत असताना त्यामध्ये विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचे अथवा शिक्षकांच्या सेवा डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टखाली अधिगृहीत करण्याचे सर्व अधिकार आपणास आहेत. नाशिक मध्ये येणारा प्रत्येक रस्ता, टोल नाका या सर्वांवर 24 तास तपासणी केली जावी, असे आदेशात म्हटले आहे.  या पथकाने प्रवाशांची तपासणी करून त्यामध्ये केवळ प्राथमिक माहिती घ्यावयाची आहे.

प्रामुख्याने सकृतदर्शनी कोणी परदेशातून अथवा अन्य कोरोनाबाधित जिल्ह्यातून येत असलेली व्यक्ती आहे काय, अशा व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप अथवा अन्य काही आजार आहे. काय, होम क्वारांटाइन (HQ) शिक्का असलेली कोणी व्यक्ती आहे काय याबात माहिती विचारावी. जर यापैकी एकही बाब असलेली कोणी व्यक्ती त्या प्रवाशांमध्ये असेल तर प्रथम अशा व्यक्तीचा मोबाईल, दूरध्वनी क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी माहिती रजिस्टरमध्ये नोंदवून घ्यावी. तसेच अशा व्यक्तीने ताबडतोब  स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये जावे व आपली तपासणी करून घ्यावी, असे आदेश त्यांना द्यावेत असेही निर्देश श्री. मांढरे यांनी दिले आहेत.

तसेच या सूचना व आदेशांचे पालन तातडीने न केल्यास केल्या जाणाऱ्या फौजदारी कारवाई बाबत नागरिकांना  कल्पना द्यावी. तपासणीचे आदेश किती लोकांना दिले आहेत त्यांची नावे,पत्ता,दूरध्वनी क्रमांक यासह सविस्तर यादी दररोज संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे सर्व पथकांनी जमा करावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्यापैकी सर्व व्यक्तींनी अशी तपासणी करून घेतली आहे, याची शहानिशा करावी. त्यापैकी एखादी व्यक्ती शिल्लक राहिली असल्यास संबंधित पोलीस स्टेशन कडे अशी माहिती देऊन त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात यावे. या संपूर्ण कार्यवाही बद्दल संबंधित प्रांताधिकाऱ्यानी दररोज सायंकाळी 7 वाजता सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

आगामी पंधरा दिवस प्रवास टाळावा-

या आजाराचा प्रसार केवळ सार्वजनिक ठिकाणच्या संसर्गामुळे वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आजारी व्यक्ती लहान मुले वयस्कर व्यक्ती यांनी आगामी पंधरा ते वीस दिवस प्रवास टाळावा. इतर व्यक्तींनी देखील अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा, विनंती वजा आवाहन करताना कुठल्याही प्रकारचे आदेश,सूचना यांना प्रतिसाद न देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी  कळविले आहे.

 ‘कोरोना चेकपोस्ट’ कार्यपद्धती अशी

प्रांताधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर टीम तयार करून ‘कोरोना चेकपोस्ट’ तयार करणार. विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचे अथवा शिक्षकांच्या सेवा डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टखाली अधिगृहीत करणार.जिल्हा व शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्ता, टोल नाका सर्वांवर 24 तास चालणार तपासणी केली जावी. परदेशातून आलेल्या अथवा क्वारनटाइन बाधित जिल्ह्यातील व्यक्तीची माहिती घेतली जावी.सर्दी,खोकला,ताप,अन्य, होम क्वारांटाइन (HQ) शिक्का असलेली व्यक्ती याबात माहिती घ्यावीव्यक्तीचा मोबाईल,दूरध्वनी क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी माहिती रजिस्टरमध्ये नोंदवून तपासणीचे आदेश देणार. संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे सर्व पथक माहिती जमा कराणार. तपासणीची शहानिशा होणार.दररोज सायंकाळी 7 वाजता सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा लागणा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक