शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा भयावह विस्फोट झाला असून बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल २१४६ इतके बाधित रुग्ण आढळले ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा भयावह विस्फोट झाला असून बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल २१४६ इतके बाधित रुग्ण आढळले असून हा गत वर्षापासूनचा एकाच दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल करु लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात बुधवारी तब्बल २१४६ बाधित रुग्ण तर ६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ३, मालेगावला १, ग्रामीणला ४ तर जिल्हा बाह्य १ असे एकूण ९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २१९३ वर पोहोचली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधितांची दररोजची संख्या साधारणपणे दीडशेच्या आसपास आली होती. मात्र, दरम्यानच्या काळातील लग्नसोहळे आणि उत्सवी वातावरणासह जनतेत कोरोनाबाबत आलेल्या बेफिकरीमुळे कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी कोरोनाबाधितांचा आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे २१४६ इतका बाधित आकडा आल्याने तर नागरिकांसह सर्वत्र पुन्हा एकदा कोरोनाची भीती जाणवू लागली आहे.

इन्फाे

नाशिक मनपा क्षेत्रात १२९६

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १२९६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाची सर्वाधिक दहशत निर्माण झाली आहे.

इन्फो

सप्टेंबरनंतर आताच

गतवर्षी सर्वाधिक कोरोना रुग्ण १६ सप्टेंबरला सापडले होते. त्यावेळी ही बाधित संख्या तब्बल २०४८ इतकी होती. तेव्हा प्रथमच आणि एकदाच कोरोनाने दोन हजारांचा भयावह टप्पा ओलांडला होता. त्यानंतर थेट मार्च महिन्यातच कोरोनाने त्यापेक्षाही ९८ अधिक म्हणजे २१४६ इतके बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे.

इन्फो

आठवडाभरात १० हजारावर बाधित

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत हजारावर भर पडण्यास ११ तारखेपासून प्रारंभ झाला. ११ मार्चला ११४०, १२ मार्चला ११३८ , १३ मार्चला १५२२, १४ मार्चला १३५६, १५ मार्चला १३७६, १६ मार्चला १३५४ तर १७ मार्चला तब्बल २१४६ असा सलग आठवडाभर कोरोनाबाधितांच्या संख्येने अक्षरश: कळस गाठला आहे. आठवडाभरातील बाधितांची संख्या तब्बल १०,०३२ वर पोहोचली आहे.