शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दोघे अधिकारी बाधित : इंदिरानगर पोलीस ठाण्यात पुन्हा ‘कोरोना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 14:46 IST

त्यावेळी वडाळा परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला

ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वीच एकाचा बळी

नाशिक  : पोलीस ठाण्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून या पोलीस ठाण्यात कार्यरत दोघा उपनिरिक्षकांचे कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपुर्वीच याच पोलीस ठाण्यातील एका कोरोनाबाधित रूग्णाची उपचारादरम्यान सुरू असलेली झुंज अपयशी ठरली होती.इंदिरानगर पोलीस ठाण्यातील वडाळागाव भागात साधारणत: महिनाभरापुर्वी मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण आढळून येत होते. यामुळे वडाळा हे शहराचे नवीन हॉटस्पॉट बनले होते. त्यादरम्यान, मनपाने गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी वाढविण्यात आला. सादिकनगर, महेबुबनगर, साठेनगर, गुलशननगर या भागात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून येत होते. यामुळे या परिसरावर पोलिसांनी गावठाणपेक्षा अधिक लक्ष केंद्रीत केले होते. सातत्याने पोलीस गस्त आणि नागरिकांना घरात बसण्यास आवाहन केले जात होते. दुकाने या भागात उघडणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. त्यावेळी या परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला आहे.

काही दिवसांपुर्वीच येथील कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असतानाच पुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस उपनिरीक्षक कर्तव्य बजावताना कोरोनाबाधित झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल आहे; मात्र घाबरण्याचे कारण नसून दोघा अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस