शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
3
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
4
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
5
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
6
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
7
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
8
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
9
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
10
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
11
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
12
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
13
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
14
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
15
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
16
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
17
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
18
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
19
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
20
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

कोरोनामुळे मालमत्ता कर वसुलीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:00 PM

कोरोनाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे. मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाल्याने विकासकामांना खीळ बसणार आहे. आतापर्यंत केवळ २२ कोटी २६ लाख ३८ हजार ४० रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे.

मालेगाव : कोरोनाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे. मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाल्याने विकासकामांना खीळ बसणार आहे. आतापर्यंत केवळ २२ कोटी २६ लाख ३८ हजार ४० रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे.गेल्या १२ मार्चपासून वसुलीवर परिणाम झाला आहे. प्रारंभी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. मालमत्ता कर वसुलीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना रोखण्यासाठी कार्यरतरहावे लागले. परिणामी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर याचा परिणाम झाला. घरपट्टीची मागणी ४६.७० कोटी असताना केवळ ५६ लाख ९३ हजार १७८ रुपये वसूल झाले आहे. ५०.५१ टक्केच वसुली झाली आहे, तर पाणीपट्टीची २१ कोटी ५२ लाख मागणी असताना केवळ ८ कोटी ६९ लाख ४४ हजार ८६२ रुपये वसूल झाले आहे. ३४.७५ टक्केच वसुली झाल्यामुळे याचा परिणाम थेट महापालिकेच्या तिजोरीवर होणार आहे. शासन अनुदानित विकासकामे मार्गी लागणार असले तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकात व विकासकामांना खीळ बसणार आहे. वसुली व मासिक खर्चात त्यामुळे तफावत निर्माण झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे पुढील दीड ते दोन वर्षे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे चिन्हे दिसत नाही. महापालिकेकडून कोरोनाच्या उपाययोजनेसाठी निधी राखीव केला गेला आहे. सध्या महापालिकेला जीएसटीतून केवळ १४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. यातूनच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून इतर खर्च भागविला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या