ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मऱ्हळ उपकेंद्राद्वारे हे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सरपंच सुजाता शिवाजी घुगे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून गावातील कुटुंबांंचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुटे, आशा कुटे, किरण कुटे, संगीता पवार, ग्रामसेवक माया मोढे, शिवाजी घुगे, पोलीस पाटील संदीप कुटे, डॉ. पवार, आशा सेविका सगर, माळवे, जयराम कुटे, भाऊसाहेब बोडके, बाळकृष्ण कुटे, वसंत कुटे, ज्ञानेश्वर कुटे, कारभारी घुगे, शशिकांत कुटे, नीलेश लढ्ढा, बंडू कुटे, रामनाथ बर्डे व ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. आरोग्य कर्मचा-यांनी परिश्रम घेऊन लसीकरण यशस्वी केले.
मऱ्हळला कोरोना प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST