शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मक्याने चुकविला काळजाचा ठोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:24 IST

राजेश माळी । पाटणे : यावर्षी मका पिकांवर संकटाची मालिका सुरूच असून, प्रथमच मका पिकावर लष्करीअळीचे आक्रमण झाले त्यातूनही ...

ठळक मुद्देदर कोसळले : पाटणे परिसरातील शेतकरी हवालदिल

राजेश माळी ।पाटणे : यावर्षी मका पिकांवर संकटाची मालिका सुरूच असून, प्रथमच मका पिकावर लष्करीअळीचे आक्रमण झाले त्यातूनही औषधांची फवारणी करून मका पीक वाचविले. पुन्हा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.मक्याचे जे उत्पादन मिळाले त्याला सुरुवातीला हमीभाव (१७६०) पेक्षा जास्त भाव मिळाला. उत्पन्न कमी झाल्याने मक्याला मागणी चांगली होती. भविष्यात भाववाढ वाढतील या अपेक्षेने बळीराजाने मका साठवून ठेवला; परंतु गेल्या सप्ताहापासून प्रत्यक्षात मक्याचे बाजारभाव शासकीय आधारभूत किमतीपेक्षा दिवसेंदिवस कमी होऊ लागले. सुरुवातीला दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल असलेल्या मकाचा भाव सध्या बाराशे ते पंधराशे प्रति क्विंटल, असा घसरतो आहे. यामुळे शेतकऱ्यांंचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून, हे संकटाचे चक्र बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. मकाच्या विक्रीतून येणाºया पैशांवर घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींची लग्न, आरोग्य, रब्बीची लागवड यावर मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी खरिपातील मका विक्र ी उशिरा करून दोन पैसे अधिकचे मिळवण्याचे असणारे स्वप्न धुळीस मिळाले आहे . दिवसेंदिवस बाजारभावातील होणारी घसरणीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मका पिकावर तिसरे संकट कोसळले आहे. रब्बी हंगामातील मका उत्पादन बाजारात येण्यासाठी थोडा कालावधी आहे.दर कसा मिळेल या विचाराने शेतकरी आतापासूनच चक्रावून गेला आहे. आता फक्त शासनाने हमीभावापेक्षा जास्त भाव देऊन मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने बळीराजाला दिलासा देण्याची मागणी वाढत आहे.हजारो रुपयांचा खर्चअवकाळी पावसामुळे सर्वत्र मुबलक पाणी आहे. रब्बी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून, उन्हाळ कांद्याची लागवड प्रथमच फेब्रुवारी महिन्यापर्यंत बघावयास मिळत आहे, परंतु सततचे बदलते दूषित वातावरण, अल्प प्रमाणात असलेली थंडी यामुळे उन्हाळ कांद्याचे उत्पादन पाहिजे तसे हाती लागेल याची शाश्वती दिसून येत नाही. लागवडीसाठी हजारो रूपये खर्च करूनही खर्च निघेल की नाही ही भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. खरिपाबरोबरच रब्बीचे उत्पादन मिळेल की नाही याची खात्री नाही. एकूणच मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड