शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

आज थंडावणार प्रचाराच्या तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:15 IST

सिन्नर/मालेगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज खाली बसणार आहे. सर्वच उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी शहरी भागात प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर असल्याचे दिसून येते. प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी सर्वांनीच नियोजन केले आहे.

ठळक मुद्देशहरी भागावर लक्ष केंद्रित : सांगता दणक्यात करण्याचे उमेदवारांचे नियोजन

सिन्नर/मालेगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज खाली बसणार आहे. सर्वच उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी शहरी भागात प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर असल्याचे दिसून येते. प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी सर्वांनीच नियोजन केले आहे.विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून, उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. १९ आॅक्टोबर रोजी प्रचारतोफा थंडावणार असल्याने गावोन्गाव पिंजून काढण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे समर्थक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाल्याचे दिसते. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी निर्माण झाली असून, कोण विजयी होणार याचीच सर्वांना उत्सुकता आणि चर्चा रंगू लागली आहे.नाशिक जिल्ह्यात पंधरा विधानसभा मतदारसंघातनिवडणूक होत आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी आणि तिरंगी लढती होत आहेत. सेना-भाजप - रिपाइं (आठवले) -रासप, शिवसंग्राम यांची महायुती असून, कॉँग्रेस-राष्टÑवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (कवाडे) आदींची महाआघाडी आहे. त्यामुळे या प्रमुख पक्षांत खरी लढत होत आहे. शहरी भागात काही ठिकाणी मनसेने व वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे झेंडे, लोकगीते यांनी वातावरण निवडणूकमय झाले आहे. ग्रामीण भागात उमेदवारांनी आठ - दहा दिवस गट-गणनिहाय प्रचाराचे दौरे केले. आता शेवटच्या दिवशी शहरी भागात लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन आहे.ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या उमेदवाराची प्रचार रॅली काढली जाते. उमेदवार मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. उमेदवार शेवटच्या दिवशी शहरात शक्तिप्रदर्शन करणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.सर्वच उमेदवार आज मोटारसायकल रॅली, प्रचारफेरी काढून वातावरण ढवळून काढणार आहेत. प्रचाराची लगीनघाई, गल्लोगल्ली पदयात्रासोमवारी होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १९) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराची सायंकाळी ५ वाजता सांगता होणार आहे. अवघा एकच दिवस हातात उरल्याने प्रचारचा धुरळा उडाला असून, गावोगावी, गल्लोगल्लीत लगीनघाईचा माहोल आहे. पदयात्रा, रॅली, कोपरासभांच्या माध्यमांतून उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निकराचा प्रयत्न करीत आहेत. गटांच्या फोडाफोडींसह एकगठ्ठा मतदानासाठी रसद पोहोचविणारी छुपी यंत्रणा सक्रिय झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर सभेपेक्षा वैयक्तिक गाठीभेटीवरच भर देण्याचे उमेदवारांचे नियोजनदिसते. सभेत यंत्रणा गुंतविण्याऐवजी गावागावांत, गल्लोगल्ली पदयात्रांवरचभर आहे. शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला जात आहे.छुप्या प्रचाराला येणार वेगमतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या वेळेपासून ४८ तासांपूर्वीच प्रचार बंद करावा लागतो. सोमवारी मतदान होणार असल्याने शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. बॅनर, झेंडे उतरवून ठेवण्यासह गाड्यांचे भोंगे बंद होणार आहेत. असे असले तरी छुप्या प्रचाराला शनिवारी सायंकाळपासून वेग येणार आहे. उर्वरित दोन दिवस निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. याच कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. जाहीर प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचाराला वेग येणार असला तरी त्यावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहाणार आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक