नाशिक : महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘जैन एकता मंच’ तर्फे महिलांसाठी लायन्स क्लब येथे पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धकांना मोनालिसा जैन, परीक्षक संगीता बडेर, स्वाती सोनवणे, मंगला घिया, लिना पिंचा, पौर्णिमा सराफ, शर्मिला मुथ्था, सुरेखा कांकरिया यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. गोड पदार्थ स्पर्धेत प्रथम क्रमांक राजश्री बोरा, द्वितीय उषा राका, तृतीय छाया इखनकर, तिखट पदार्थ स्पर्धेत प्रथम क्रमांक, सविता बेदमुथा, द्वितीय रूपाली छाजेड, तृतीय प्रिती चोरडिया यांनी मिळविले. याप्रसंगी उन्नती भटेवरा, दिलीप ताथेड, अनुजा कोठारी, सुप्रिया ओस्तवाल, मंगला घिया, शर्मिला मुथ्था, राखी जैन आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जैन एकता मंचतर्फे पाककला स्पर्धा
By admin | Updated: February 5, 2017 22:42 IST