नाशिक : दि इन्स्टिटयूट आॅफ चार्टर्ड अकाउंट्स, नाशिक यांचे विद्यमाने सोमवारी (दि.१३) जीएसटी संदर्भात राज्यकार सहआयुक्त अजय बोन्डे यांचे मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी राज्यकर उपायुक्त विनोद पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यात विवरणपत्र , रिफन्ड तसेच इतर बाबी संदर्भात सीए शाखा तसेच कर सल्लागार असोसिएशन यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्र माप्रसंगी सीए शाखेचे अध्यक्ष हर्षल सुराणा, उपाध्यक्ष सीए रोहन वसंत आंधळे, सचिव सीए राजेंद्र शेटे, खजिनदार सोहिल शाह, विद्यार्थी शाखा प्रमुख राकेश परदेशी, संजीवन ताम्बूलवाडीकर, पियुष चांडक, उल्हास बोरसे, आर.जे. कलंत्री, विकास सुराणा, नरेंद्र काळे, रमेश जाजू, प्रदीप क्षत्रिय, सुरेश बोथरा, अनिल चव्हाण, नितीन फिरोदिया, जी.एस.टी विभागाचे एम.व्ही.दोंदे, संतोष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
जीएसटीवर संदर्भात चर्चासत्र संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:12 IST
विवरणपत्र , रिफन्ड तसेच इतर बाबी संदर्भात सीए शाखा तसेच कर सल्लागार असोसिएशन यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले
जीएसटीवर संदर्भात चर्चासत्र संपन्न
ठळक मुद्देराज्यकार सहआयुक्त अजय बोन्डे यांचे मार्गदर्शन शाखा तसेच कर सल्लागार असोसिएशन यांच्या शंकांचे निरसन