शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:32 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय करणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती उषा शिंदे होत्या.

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय करणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.अध्यक्षस्थानी सभापती उषा शिंदे होत्या. प्रारंभी गेल्या वर्षभरातील दिवंगत नामवंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अतिथीच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सचिव डी. सी. खैरनार यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. सन २०१६-१७ या वर्षात ३५ लाख ४६ हजार ०९७ क्विंटल मालाची आवक येवला मार्केटच्या उपबाजार आवारात झाली. या मालाची एकूण किंमत २१८ कोटी ५५ लाख ६३ हजार १०० एवढी झाल्याचे खैरनार यांनी सांगितले. यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. माणिकराव शिंदे यांनी, घोडेबाजार, बैलबाजार, वेअर हाउस यासाठी बाभूळगाव रस्त्यावर पाच एकर जागा कराराने घेण्यासाठी संबंधितांना अनामत रक्कम दिली असून, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले. माजी आमदार मारोतराव पवार यांनी शेतकºयाची व व्यापाºयांची व्यथा मांडली. संचालक मकरंद सोनवणे यांनी शासनाला घरचा आहेर देत व्यापारी टिकला तर शेतकरी टिकेल, व्यापाºयांना बळ देता आले नाही तरी चालेल; पण धाडसत्राने सूड उगवू नका असे शासनाला सुनावले. शेतकरीहिताचा हा निरोप भाजपाचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी त्यांच्या शासनाला द्यावा आणि शासनाने याचा खुलासा करण्याची मागणी केली. सभापती उषा शिंदे यांनी, यंदा खरिपाला पोषक वातावरणामुळे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढले आहे; पण भावाची शाश्वती नसल्याने चिंता व्यक्त केली.सभेला उपसभापती गणपत कांदळकर, कृउबा संचालक कृष्णराव गुंड, नवनाथ काळे, संजय बनकर, अशोक मेंगाणे, मोहन शेलार, नंदकुमार अट्टल, सुभाष समदडिया, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, संतू पा. झांबरे, धोंडीराम कदम, पुष्पा शेळके, मनीषा जगताप, गोरख सुरासे, देवीदास शेळके, बी.आर लोंढे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, एकनाथ साताळकर, विठ्ठल आठशेरे, सुनील पैठणकर आदी उपस्थित होते.मका खरेदीबाबत शासनाकडे पाठपुरावा करणारयंदा मक्याचे पीक चांगले असून, शेतकºयांना मक्याला चांगला भाव मिळावा म्हणून मका खरेदी व्यवहारावर बाजार समिती नियंत्रण ठेवणार आहे. शासनाकडे मका खरेदीबाबत पाठपुरावा करणार असून, मार्केट बाहेर मका खरेदी करता येणार नाही, याबाबत मार्केट कमिटी कायदेशीर कारवाईचा मार्गदेखील खुला आहे. शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय उपलब्ध करून करणार  दिवाळीनंतर कांदा उत्पादक शेतकºयांना लिलावानंतर तत्काळ रोख स्वरु पात पैसे अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.  पणन व जिल्हा उपनिबंधक यांच्या सूचनेनुसार आॅनलाइन मार्केट सुरू करण्यासाठी शेतकरी आणि व्यापाºयांचा प्रतिसाद नसला तरी आपल्याला मानसिकता बदलून कालानुरूप बदलण्यासाठी शेतकºयांना आपल्या शेतमालाची प्रतवारी करूनच माल मार्केटला आणावा लागेल.