नाशिक- महापालिका निवडणूकीतील निकालाचे पडसाद अद्याप कायम आहेत. वाद विवादाच्या घटना घडत असतानाच आता आता गोविंद नगर भागातील एका बॉक्स क्रिकेटच्या जाळ्यांना अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा प्रकार घडला. ही आग विरोधकांनी जाणिवपूर्वक लावल्याचा आराेप या प्रभागातील शिंदे सेनेचे नगरसेवक प्रविण तिदमे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी महापालिकेने तातडीने पोलीसांत तक्रार करावा यासाठी प्रशासनाला पत्र दिले आहे.
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये हा प्रकार घडला. या प्रभागातून तिदमे हे निवडून आले आहेत. ते शिंदे सेनेचे महानगर प्रमुख असून यापूर्वीही त्यांनी या भागाचे नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीतच हा बॉक्स क्रिकेट उभारला आहे. निवडणूकीत तिदमे यांच्या विरोधात अनेक व्हीडीओ व्हायरल करण्यात आले होते. दरम्यान आता ते निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रभागातील गोंविंद नगर येथील बॉक्स क्रिकेटला आग लावण्याचा प्रकार घडला आहे.
यासंदर्भात तिदमे यांनी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या या पहिल्या टर्फ विकेट बॉक्स क्रिकेटला अज्ञात समाज कंटकांनी आग लावली. त्यामुळे सुमारे ६० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पोलीसांत तक्रार करावी अशी मागणी त्यांंनी केली आहे.
Web Summary : Post-election, a box cricket facility in Nashik's Govind Nagar was set on fire. Corporator Pravin Tidme alleges political sabotage, demanding a police investigation into the ₹60 lakh loss.
Web Summary : चुनाव के बाद, नासिक के गोविंद नगर में एक बॉक्स क्रिकेट सुविधा में आग लग गई। पार्षद प्रवीण तिडमे ने राजनीतिक तोड़फोड़ का आरोप लगाया, ₹60 लाख के नुकसान की पुलिस जांच की मांग की।