नाशिक : महापालिकेच्या महासभेने यापूर्वी आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीला विरोध करूनही कंत्राटीकरणाचे प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी आणले जात असल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. कंत्राटी पद्धतीने भरतीला विरोध लक्षात घेता महापौरांनी पुढील महासभेत रिक्त पदांचा आकृतिबंध सादर करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले.निलगिरी बाग येथील ५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसंदर्भात सुमारे २ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आणि फाळके स्मारक येथे सुरक्षारक्षक नियुक्तीबाबतचा प्रस्ताव महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
कंत्राटी भरतीला महासभेचा विरोध
By admin | Updated: September 20, 2016 01:04 IST