शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:54 IST

ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

नाशिक : ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा पायलटने निर्णय घेतला. दरम्यान, या दोघांच्या वादामुळे पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर वातावरणातील तणाव निवळला. अर्धातासानंतर गांधी दिल्लीकडे रवाना झाले.राहुल गांधी यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते रोडमार्गे संगमनेर येथे रवाना झाले. रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर सभेला मार्गदर्शन केल्यानंतर गांधी यांनी संगमनेर येथेच मुक्काम केला. शनिवारी सकाळी त्यांनी ओझरकडे प्रयाण केले. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या एसपीजीने पायलटच्या ताब्यात असलेल्या बॅगेची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. बॅगेची तपासणी झाल्याचे सांगितल्यावरही एसपीजी ठाम असल्याने वाद नको म्हणून पायलटने त्यांच्या हातात बॅग सोपविली. त्या बॅगेत एक पाऊच होते व त्याला कुलूप असल्याने ते उघडविण्याचा आग्रह पायलटने धरला. तथापि, पायलटने ‘तुम्ही तुमचे उघडून घ्या’ असे सांगितले. चार वर्षांपासून गांधी यांच्या विमानाचा पायलट म्हणून काम करीत असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. दोघांचे भांडण सुरू झाल्याने राहुल गांधी यांची वाट पहात असलेले पोलीस, प्रशासनातील अधिकारी व कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.‘आमची मानसिकता बिघडल्याने आता विमान चालवू शकत नाही’ अशी भूमिका पायलटने घेतली. दरम्यान, थोड्याच वेळात गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लॅँडिंग झाले. त्यांना शहर अध्यक्ष शरद अहेर यांनी पायलट-एसपीजी यांच्यातील वादाची कल्पना दिली. गांधी यांनी वाद समजावून घेतल्यानंतर दोघांपैकी कोणीच कोणाची दिलगिरी व्यक्त करणार नाही, मीच दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर दोघांनीही समजूतदारपणा दाखविला व वादावर पडदा टाकण्यात आला.अग्निशामक दलाच्या वाहनात गांधी बसलेपायलट-एसपीजी दोघांमधील वाद मिटल्यानंतर पायलटने विमान सुरू केले. उड्डाणासाठी वीस मिनिटे शिल्लक असल्याने राहुल गांधी यांचे अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. तेथे गेल्यावर त्यांनी अग्निशामक दलाच्या बंबावर चढून चालक व जवानाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पायलट-एसपीजी यांच्यात झालेल्या वादाची कहाणीही त्यांना सांगून टाकली.

टॅग्स :AirportविमानतळNashikनाशिकRahul Gandhiराहुल गांधीpilotवैमानिक