शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सटाण्यातील वादग्रस्त भिंत अखेर उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:32 IST

सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे १२ मीटर रुंदीचा रस्ता नागरिकांसाठी खुला झाला आहे.

सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे १२ मीटर रुंदीचा रस्ता नागरिकांसाठी खुला झाला आहे.सुमारे ४ वर्षांपूर्वी सटाणा शहरातील काही नागरिकांना एकत्र येऊन श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली. मालेगाव रोडवर जागा घेऊन बंगले बांधले व मध्य भागातून कॉलनी रोड ठेवला. पूर्वी त्या परिसरात आजूबाजूला शेती असल्यामुळे कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर भिंत बांधून रोड बंद केला गेला. मात्र, आता त्या परिसरात प्लॉट पडल्यामुळे कॉलनी रोड वापरण्याची गरज निर्माण झाली. तेव्हा श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेने कॉलनी रोड खासगी आहे. नगर परिषदेचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका घेतली व रस्त्यावर बांधलेली भिंत काढून घेण्यास नकार दिला होता. काही नागरिक शासनाकडे गेले, तेव्हा नगरविकास राज्यमंत्री यांनीही सदरची भिंत पाडून टाकण्याचा आदेश दिला. तरीही संस्थेने भिंत काढली नाही. त्यामुळे नगर परिषदेने संस्थेला भिंत काढून घेण्याबाबत नोटीस बजावली. तेव्हा संस्थेने नोटीस बेकायदेशीर आहे, असे सांगून न्यायालयात धाव घेतली व तात्पुरता मनाई हुकूम घेतला होता.------------------न्यायालयाच्या आदेशाने कारवाईचौकशीअंती न्यायालयाने कॉलनी रोडवर बांधलेली भिंत काढून टाकण्यास नगरपालिकेला अधिकार असल्याचा निकाल दिल्याने नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख धनंजय अहिरे, अभियंता शालिमार कोर, रमेश धोंडगे यांच्या उपस्थितीत सदरची भिंत गुरुवारी (दि. २७ ) सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक जिभाऊ पवार, पोलीस नाईक नवनाथ पवार, अजय महाजन, भोईर यांच्या कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक