खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 02:25 PM2020-07-29T14:25:43+5:302020-07-29T14:26:28+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अ. ज्ञा. होमकर यांनी निलंबित केल्याचा आदेश काढला आहे.

Controversial medical officer of Khed Primary Health Center Sanjay Pawar suspended | खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित

खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित

Next
ठळक मुद्दे पदावर कार्यरत असतांना असंख्य तक्र ारी, गैरव्यवहाराचे आरोप

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अ. ज्ञा. होमकर यांनी निलंबित केल्याचा आदेश काढला आहे.
इगतपुरी तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असतांना असंख्य तक्र ारी, गैरव्यवहाराचे आरोप, लोकप्रतिनिधींचे आदेश धुडकावून लावणे आदी कारणांमुळे अवर सचिवांनी डॉ. संजय लक्ष्मण पवार यांच्या निलंबीत करण्याचा आदेश पारित केला आहे.
इगतपुरी तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी ह्या पदावर डॉ. संजय लक्ष्मण पवार हे काही वर्षापूर्वी कार्यरत होते. ह्या काळात त्यांच्याबाबत तत्कालीन सभापती, उपासभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदींनी गंभीर स्वरूपाच्या तक्र ारी केल्या होत्या. अनेकदा पदाधिकाऱ्यांसोबत वाद आणि तक्र ारी वाढल्या होत्या. डॉ. पवार यांची नियुक्ती राज्य शासनाची असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हा परिषद हतबल ठरली होती. खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरिदार लोहकरे यांनी याबाबत पाठपुरावा केला.

प्रतिक्रि या
डॉ संजय पवार हे सामान्य रु ग्णांबरोबर नेहमीच अरेरावीने वागत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी ते जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांचे बरोबरच लोकप्रतिनिधीना सुध्दा ते जुमानत नसत, तालुका आरोग्य अधिकारी असतांना केलेल्या नियमबाह्य कामकाज याचा पाठपुरावा करून निलंबन करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.
- हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य, खेड.
(फोटो २९ डॉ. पवार)

Web Title: Controversial medical officer of Khed Primary Health Center Sanjay Pawar suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.