शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट फोन’ला ठेकेदारांची ना-ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:15 IST

चार हजार रुपये किमतीत ‘स्मार्ट फोन’ खरेदी करून तो मतदार याद्यांचे काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांना (बीएलओ) देण्यासाठी निवडणूक विभागाने मागविलेल्या फेरनिविदेतही फक्त दोनच ठेकेदारांनी भाग घेतल्यामुळे पुन्हा तिसºयांदा निविदा मागविण्याची वेळ आली, त्यामुळे आता आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत काम करण्यासाठी दिलेली मुदत वाढविली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक : चार हजार रुपये किमतीत ‘स्मार्ट फोन’ खरेदी करून तो मतदार याद्यांचे काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांना (बीएलओ) देण्यासाठी निवडणूक विभागाने मागविलेल्या फेरनिविदेतही फक्त दोनच ठेकेदारांनी भाग घेतल्यामुळे पुन्हा तिसºयांदा निविदा मागविण्याची वेळ आली, त्यामुळे आता आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत काम करण्यासाठी दिलेली मुदत वाढविली जाण्याची शक्यता आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केली असून, १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार नोंदणीबरोबरच मतदारांची संपूर्ण माहिती गोळा करून ते निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला माहिती सादर करतील, असे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रस्तरीय अधिकाºयांना चार हजार रुपये किमतीचा ‘स्मार्ट फोन’ आयोग स्वखर्चाने घेऊन देणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिंडोरी तालुक्याची त्यासाठी निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दिंडोरीसाठी नेमण्यात आलेल्या सुमारे तीनशे केंद्रस्तरीय अधिकाºयांना स्मार्ट फोन घेण्यासाठी बारा लाखांची तरतूद करण्यात आली आहे.  जिल्हा निवडणूक शाखेने आयोगाला अपेक्षित असलेले फिचर्स समाविष्ट असलेले ‘स्मार्ट फोन’ पुरविण्यासाठी जाहीर निविदा मागविल्या, परंतु स्मार्ट फोनसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असून, कोणतीही नामांकित कंपनी चार हजार रुपयांत ‘स्मार्ट फोन’ देऊ शकत नसल्याने निवडणूक शाखेच्या निविदेत फक्त दोनच निविदाधारक सहभागी झाले. आता तिसºयांदा निविदा मागविण्यात येणार नियमानुसार कोणत्याही ठेक्यासाठी कमीत कमी तीन निविदाधारक सहभागी होणे आवश्यक असल्याने जिल्हा निवडणूक शाखेला पुन्हा स्मार्ट फोनसाठी फेरनिविदा काढावी लागली आहे. शुक्रवारी या निविदा उघडण्यात आल्या मात्र त्यातही दोघांनीच भाग घेतल्यामुळे आता तिसºयांदा निविदा मागविण्यात येणार आहे. परिणामी आयोगाने दिलेली ३० नोव्हेंबरच्या आत मतदार याद्यांचे अद्यावतीचे कामकाज पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे या कामाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकMobileमोबाइल