शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार जोमात, महापालिका कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:30 IST

महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देनिदर्शने : घरपट्टी, पाणीपट्टीचे खासगीकरण, फायर बॉल निविदेला विरोध

नाशिक : महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीच्या ठेक्या आडून मन्नुभाईला पुन्हा महापालिकेत शिरकाव करण्यास विरोध करण्यात आला असून भ्रष्टाचारी ठेकेदाराला काम देण्याचे षडयंत्र थांबवावे अशी मागणीही या पक्षाने केली आहे.महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारी आणि त्यातील भ्रष्टाचार गाजत असून काँग्रेस सेवा दलाचे वसंत ठाकूर यांनी या प्रकारांमुळे महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली हेाती. त्यानंतर बुधवारी (दि.३०) काँग्रेस पक्षाच्या वतीने राजीव गांधी भवनात मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ठेकेदार जोमात, महापालिका कोमात, स्मार्ट सिटी, स्मार्ट रस्ता, भ्रष्टाचार केला उठता बसता अशा प्रकारचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहु खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, समीर कांबळे, बबलू खैरे, सुरेश मारू यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.महापालिकेच्या आउटसोर्सिंगच्या ठेक्यात मेाठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून हा ठेका रद्द करावा, भ्रष्टाचारी ठेकेदाराला समोर ठेवून घरपट्टी पाणीपट्टी वसुलीच्या निविदांचे नियम ठरवले जात आहेत. ते रद्द करावे, पेस्ट कंट्रोल, फाळके स्मारक कलामंदिरासह अनेक मनपा इमारतीत खासगीकरणातून सफाईची कामे केली जात आहेत. ती रद्द करावीत, यांत्रिकी झाडूने सफाई करण्याचा प्रस्ताव रद्द करावा, फायर बॉल निविदेतील घोळ बघता हा ठेका रद्द करून अगोदरच्या शिडी खरेदीची चौकशी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcongressकाँग्रेस