आयटीआय, तंत्रनिकेतन व फायर सेफ्टीत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:45 PM2020-01-04T23:45:14+5:302020-01-04T23:45:40+5:30

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला.

Contract in ITI, Technologies and Fire Safety | आयटीआय, तंत्रनिकेतन व फायर सेफ्टीत करार

चांदवड येथील शासकीय आयटीआय व नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन या संस्थेत सामंजस्य करार देताना प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, प्राचार्य बी. जी. जाधव, उपप्राचार्य एच. एस. गौडा, ए. के. वाघ, डी. एम. सातपुते, मधुर गुजराथी.

Next

चांदवड : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला.
तिन्ही संस्थांमध्ये असणारी यंत्रसामग्री यांचा प्रशिक्षणासाठी
वापर करण्याच्या करारात निश्चित करण्यात आले. तसेच निर्देशक व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन करणे, रोजगार स्वयंरोजगार यांचे मेळावे घेणे व रोजगारासंदर्भात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणे असे करारात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे, उपप्राचार्य एच.एस. गौडा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. जी. जाधव, गटनिदेशक ए. के. वाघ, गटनिदेशक ए. के. वाघ, डी. एम. सातपुते, मधुर महेश गुजराथी तसेच फायर सेफ्टीचे प्राचार्य अभिकुमार शिंदे आदी.

Web Title: Contract in ITI, Technologies and Fire Safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.