शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:07 IST

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे शिवाय भजनाच्या माध्यमातूनही आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या ...

ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांनी करवाढीचा निर्णय घेतल्याने नाशिककरांमध्ये कमालीचा रोष‘मी नाशिककर’ या बॅनरखाली एकवटलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिका-यांबरोबरच विविध उद्योग, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे शिवाय भजनाच्या माध्यमातूनही आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला सोबत आणत आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.तुकाराम मुंढे यांनी करवाढीचा निर्णय घेतल्याने नाशिककरांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. सदर करवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांसह व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांचे मेळावे होऊन जागृतीचे प्रयत्न सुरू होते. सत्ताधारी भाजपातही या करवाढीविरोधी अस्वस्थता निर्माण होऊन सोमवारी (दि.२३) त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण कृति समितीच्यावतीने सकाळपासूनच महापालिका मुख्यालयासमोर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. ‘मी नाशिककर’ या बॅनरखाली एकवटलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिका-यांबरोबरच विविध उद्योग, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले आहेत. याचवेळी भजन करत आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. महापालिका मुख्यालयासमोरच आंदोलकांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याने शरणपूर रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातही घोषणाबाजी होत आहे. करवाढ रद्द झालीच पाहिजे अन्यथा पालिकेला वेढा घालण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.आयुक्त राहणार गैरहजरकरवाढीविरोधी चर्चा करण्यासाठी महापौरांनी आज दुपारी विशेष महासभा आयोजित केली आहे. या महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता असून प्रसंगी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावही येण्याची चिन्हे आहेत. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज रजेचा अर्ज प्रशासनाला दिल्याने मुंढे उपस्थित राहणार नाहीत. परिणामी, मुंढेंच्या अनुपस्थितीत आजची महासभा होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे