मनमाड रस्त्याची दुरु स्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:08 AM2018-10-11T00:08:11+5:302018-10-11T00:09:44+5:30

येवला : शहरामधील नगर - मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असून, लवकरच मालेगाव ते कोपरगाव या ७५ किमी रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, रस्त्यावर झेब्रा व गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले जात आहेत. तसेच रस्त्यावरील विविध फलकदेखील दुरुस्त किंवा बदली केले जात आहे.

Continue to repair the road of Manmad road | मनमाड रस्त्याची दुरु स्ती सुरू

मनमाड रस्त्याची दुरु स्ती सुरू

Next
ठळक मुद्देनगर-फलकदेखील बदलणार : मालेगाव-कोपरगाव रस्त्याचे होणार काम

येवला : शहरामधील नगर - मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असून, लवकरच मालेगाव ते कोपरगाव या ७५ किमी रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, रस्त्यावर झेब्रा व गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले जात आहेत. तसेच रस्त्यावरील विविध फलकदेखील दुरुस्त किंवा बदली केले जात आहे.
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा बीओटीचे प्रमुख अभियंता मोहम्मद शेख यांच्या टीमने या कामाला गती दिली असून, नगर-मनमाडदरम्यान येवला शहरातून जाणाऱ्या रस्त्यासह ७५ किमीचा भाग या अंतर्गत दुरु स्तीसाठी आहे.
शहरात पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे नगर - मनमाड रस्ता मोकळा झाला आहे. दरम्यान, येवला शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपळगाव जलाल येथील टोलनाका प्रशासनाकडे या रस्त्याची दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे बीओटी तत्त्वावर असलेल्या या रस्त्याचे संबंधित ठेकेदाराने ही संधी साधून रस्ता दुरु स्तीची कामे सुरू केली आहेत. शहरातून जाणाºया या महामार्गावर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे हे रस्ते सुस्थितीत आणण्याची आवश्यकता होती.
त्यामुळे महामार्गावरील ठीक ठिकाणी रस्त्यांच्या दुरु स्तीची कामे युद्धपातळीवर सुरु आहे.
या नगर मनमाड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत असून रस्त्यावरील गतिरोधक व शाळा व इतर वर्दळीच्या ठिकाणी झेब्रा क्र ोसिंग व गतिरोधकाचे पट्टे ओढण्यात आले आहे. क्र ीडा संकुलाजवळून शेकडो विद्यार्थी ये-जा करतात.भरधाव वेगाने येणारी वाहने थांबावी म्हणून या रस्त्यावर झेब्रा क्र ोसिंगचे पट्टे नव्याने केले गेले आहे.याशिवाय शालेय परिसरात व त्यांच्या भिंतीवर विविध प्रकारची माहितीसह चित्र रेखाटली आहे.

Web Title: Continue to repair the road of Manmad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.