शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भ रुग्णालय अधिवेशनात गाजण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:18 IST

विविध कारणांनी गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या एकूणच कारभारावर रुग्ण नाराज असतानाच आता त्यात व्यवस्थापनाच्या हेकेखोर व मनमानी वर्तणुकीच्या विरोधात लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करण्यात आल्या असून, मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सदरचा प्रश्न गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नाशिक : विविध कारणांनी गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या एकूणच कारभारावर रुग्ण नाराज असतानाच आता त्यात व्यवस्थापनाच्या हेकेखोर व मनमानी वर्तणुकीच्या विरोधात लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करण्यात आल्या असून, मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सदरचा प्रश्न गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  सफाई कर्मचाऱ्यांकडून रुग्णांवर उपचार करून घेणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी उर्मटपणे वागणे, सहअधिकारी व परिचारिकांना अपमानास्पद वागणूक देणे, नको असलेली पदे भरून शासनाची फसवणूक करणे, यंत्रसामग्री बंद ठेवून रुग्णांना त्यांच्या उपचाराच्या हक्कापासून वंचित ठेवणे आदी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी यापूर्वीच आरोग्य संचालकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून, त्यातच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांच्या विरोधात सहअधिकारी व परिचारिकांनीही बंड पुकारण्याची तयारी केली आहे. सदर वैद्यकीय अधीक्षकांच्या वर्तणुकीविषयी व मनमानी कारभाराविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी आरोग्य खात्याकडे करण्यात आल्या असून, त्यात लासलगाव नियुक्ती असताना त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय जनतेला आंदोलन करावे लागले होते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीपोटी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमून त्यांना सक्तीने रजेवर पाठविण्याची कृती करावी लागली होती. त्यानंतरही त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी तक्रारी होण्याच्या प्रकारात घट झालेली नाही. संदर्भ सेवा रुग्णालयातही त्याचीच पुनरावृत्ती केली जात असून, त्यामुळे परिचारिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे तर अन्य वैद्यकीय अधिकारीही सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यातुनच संदर्भ सेवा रुग्णालयात सर्वच पक्षांना अनेक वेळा आंदोलने करावी लागली असून, शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज रुग्णालय उभारले, त्याचा गवगवा होण्याऐवजी शासनाची बदनामीच अधिक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.खासगी प्रॅक्टीसकडे अधिक कलसत्ताधारी पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींनी थेट आरोग्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे व रुग्णालय व्यवस्थापनाबाबत सभागृहातच प्रश्न उपस्थित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काही माहितीही त्यांनी गोळा केली असून, मिळालेल्या माहितीवरून रुग्णालयाच्या काही कर्मचाºयांनी या संदर्भात पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधीक्षकांचे स्वत:चे अस्थिव्यंगोपचार रुग्णालय असल्यामुळे त्यांचा कल खासगी प्रॅक्टीसकडे अधिक असल्याची तक्रारही केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल