शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागास संपर्क साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:32 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी परिसरातील नागरिक, लहान मुले, महिला येतात. अशा सर्वांची नोंद ठेवून कोरोनाची लक्षणे दिसल्यास अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा, असे आवाहन दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी केले.

ठळक मुद्देनितीन म्हस्के : ग्रामपंचायत प्रशासन व खासगी डॉक्टर यांची समन्वय बैठक

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठीपरिसरातील नागरिक, लहान मुले, महिला येतात. अशा सर्वांची नोंद ठेवून कोरोनाची लक्षणे दिसल्यास अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा, असे आवाहन दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी केले.नांदूरशिंगोटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टर व प्रशासन यांच्यात घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, नानासाहेब शेळके, भारत दराडे, अनिल शेळके, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रणाली दिघे, ए. बी. गांगुर्डे, लता कापरे, ग्रामविकास अधिकारी एस. डी.अहिरे आदी उपस्थित होते. नांदूरशिंगोटेसह दोडी बुद्रुक, मानोरी, कणकोरी परिसरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने परिसरात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी सुरू आहे. नांदूरशिंगोटे हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे खाजगी दवाखान्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिसरातील विविध गावातील शेकडो नागरिक उपचारासाठी येथे येतात. अशातच एखाद दुसरा रुग्ण कोरोना बाधित असून शकतो. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून असे रुग्ण आढळल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात पाठवून द्यावे व इतर रुग्णांची नोंद ठेवण्यात यावी, असेही डॉ. म्हस्के यांनी सांगितले.रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती बाहेर कुठेही फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सरपंच गोपाळ शेळके यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. राधाकृष्ण सांगळे, वंदना सांगळे, डॉ. रवींद्रआव्हाड, डॉ. संतोष सानप, डॉ. गौरी पवार, डॉ. शांताराम घुगे, डॉ. मेधने आदी उपस्थित होते. नांदूरशिंगोटे आरोग्य उपकेंद्रात रुग्ण संख्या वाढतीदापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअतंगर्त नांदूरशिंगोटे उपकेंद्र असून नांदूरसह मानोरी व कणकोरी या गावांचा समावेश आहे. तिन्ही गावांत अद्याप पर्यंत दीडशेच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर अखेरीस नांदूरशिंगोटेत 92 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मानोरीत 27 व कणकोरीत 19 रुग्ण बाधित आढळून आले आहे. तसेच नांदूरशिंगोटे येथील पाच, मानोरी व कणकोरी येथे प्रत्येकी तिघांचा कोरोनाने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क व सँनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य