नाशिक : भारतीय जनता पक्षापासून दुरावलेले विधान परिषदेचे आमदार डॉ. अपूर्व हिरे व त्यांचे बंधू अद्वय हिरे यांनी रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून हिरे कुटुंबीयांची राष्टÑवादीच्या नेत्यांंशी जवळीक वाढली आहे. छगन भुजबळ सध्या तुरुंगात असल्याने जिल्ह्याच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हिरे कुटुंबीयांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले पक्षाचे नेते शरद पवार यांनी श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.हिरे बंधूंनी राष्टÑवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरे बंधूंना राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करायचा असून, पुण्याच्या बैठकीत पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चा झाल्याचे समजते.प्रशांत हिरे यांना उमेदवारी शक्यविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. राष्टÑवादी कॉँग्रेसकडून माजी मंत्री प्रशांत हिरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.हिरे यांचे सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो शिवाय राष्टÑवादीलादेखील त्यांच्या अनुभवाचा लाभ होण्याची शक्यता असल्याने राष्टÑवादीने प्रशांत हिरे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:44 IST