शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ 

By संजय पाठक | Updated: December 24, 2020 06:01 IST

Consumer Day Special: बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो.

-   संजय पाठक

नाशिक : नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार ऑनलाइन फसवणुकीची तक्रारदेखील नोंदवता येणार आहे. जेथे कोठे ग्राहक असेल तेथून तक्रार केल्यानंतर अन्य राज्यात असलेल्या ऑनलाइन शॉपिंग कंपनीला नोटीस बजावून कारवाई करता येऊ शकते. बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो. जिल्हा पातळीवर एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे दाखल करता येऊ शकतात. राज्य, जिल्हा आणि अगदी तालुका पातळीपर्यंत तक्रारपूर्व निराकरण अथवा समुपदेशनासाठी मंचाचीदेखील व्यवस्था आहे. कायद्यात तरतूद झाल्यानंतर २० जुलैपासून हा कायदा अस्तित्वात आला असला तरी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आणि कार्यवाही अशा प्रकारचे काम मात्र झालेले नाही. 

केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा तयार केल्यानंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. १९८६ साली देशात कायदा करण्यात आल्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर सध्याच्या केंद्र सरकारने त्यात बदल केले आणि नवीन कायदा गेल्या २० जुलैपासून लागू करण्यात आला आहे. 

ही माेठी अडचण आहे - सध्या ऑनलाइन व्यवहार करणे आणि शाॅपिंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अशा व्यवहारात होणारी फसवणूक ही माेठी अडचण आहे. - आजवरच्या कायद्यात यासंदर्भात खूप मर्यादा होत्या, मात्र आता नवीन कायद्यात ई-मार्केटिंग आणि ई-सर्व्हिस प्रोव्हायडर्सलादेखील कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. - फसवणूक करणाऱ्यांसाठी दंड करता येत हाेता; परंतु आता नव्या कायद्यात कारावासाचीदेखील तरतूद केली आहे. 

नवीन ग्राहक कायद्यात यापूर्वी नसलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण हा विषय केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाईक यादीत आहे. नवीन कायदा २० जुलैपासून लागू झाला असला तरी त्यानंतर राज्य सरकारकडून नवीन नियमावली आणि अन्य कार्यवाही करण्यात आलेली नाही. ती करणे गरजेचे आहे.    - प्रा. दिलीप फडके, ज्येष्ठ कार्यकर्ते, ग्राहक हक्क चळवळ

टॅग्स :onlineऑनलाइनShoppingखरेदी