शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या  स्थायी सभापतींविरुद्ध बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:18 IST

महापालिकेच्या वतीने क्रीडांगणासाठी ताब्यात घेतलेल्या भूखंडाचा प्रलंबित २१ कोटी रुपयांच्या मोबदल्यावरून स्थायी समितीतील वाद आणखीनच वाढला असून, रक्कम देण्यापूर्वी स्थायी समितीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याने सर्वच सदस्यांच्या एकमुखी मागणीनुसार सभापती हिमगौरी आडके यांनी चौकशी करण्याचे आदेश बुधवारी (दि.२६) दिले आहेत.

नाशिक : महापालिकेच्या वतीने क्रीडांगणासाठी ताब्यात घेतलेल्या भूखंडाचा प्रलंबित २१ कोटी रुपयांच्या मोबदल्यावरून स्थायी समितीतील वाद आणखीनच वाढला असून, रक्कम देण्यापूर्वी स्थायी समितीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याने सर्वच सदस्यांच्या एकमुखी मागणीनुसार सभापती हिमगौरी आडके यांनी चौकशी करण्याचे आदेश बुधवारी (दि.२६) दिले आहेत. तथापि, त्यांनी यासंदर्भात समिती घोषित केलीनाही तसेच घंटागाडीच्या ठेक्याची आणि अन्य टीडीआर घोळाची चौकशी केली नाही म्हणून या सदस्यांनी सभापतींविरुद्धच बंड पुकारले.आडके यांनी त्यांच्याकडे लक्ष न देताच सभेचे कामकाज गुंडाळल्याने या सदस्यांनी फलक फडकवित सभापती हिमगौरी आडके यांचा निषेध केला आहे.डॉ. फुलकर यांच्याकडून दंड वसूल होणारमहापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर हे खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या विरुद्ध मुशीर सय्यद यांनी तक्रार केली होती, मात्र त्यांना प्रशासनाने २ लाख ४ हजार रुपयांचा दंड केला असून, तोदेखील त्यांनी भरलेला नाही तसेच ते कामावर असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. डॉ फुलकर यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त ए. पी. वाघ यांनी दिली. दरम्यान, सभापतींनीदेखील फुलकर यांच्याकडून दंड वसुलीचे आदेश दिले.मग पंचवीस प्रस्ताव रोखण्याचा त्यांचा हात आहे काय?भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्यात सभापतींचा हात आहे, असा आरोप सदस्यांनी केला. पटलावरील २५ विषय रोखण्यात सदस्यांचा हात आहे, असे म्हटले तर चालेल काय? मोबदला प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता धर्माधिकारी यांनी सदरचा विषय समितीवर आणणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. समितीत कोण असावेत याबाबत निर्णय घेण्यासाठी अवधी हवा आहे. घंटागाडी ठेक्याचे मासिक देयक रोखण्याचा आदेश आधीच दिला आहे. त्यामुळे चौकशीचे कारण नव्हते. सर्व चौकशांचा अभ्यासाअंती निर्णय घेतला जाईल.- हिमगौरी आडके, सभापती, स्थायी समिती

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक