नाशिक - माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या पत्नी सौ. सरोज पाटील यांचे दि. १३ मे रोजी निधन झाले. राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (दि.१७) विनायकदादांच्या निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पवार यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार या सुद्धा उपस्थित होत्या.शरद पवार हे सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिक येथे आले. त्यांनी अंबड-लिंकरोडवरील विनायकदादांच्या कदंब निवासस्थानी जाऊन शोकाकुल पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुमारे तासभर शरद पवार हे पाटील कुटुंबीयांसमवेत होते. यावेळी आमदार हेमंत टकले, माजी आमदार जयंत जाधव, राष्टवादीचे प्रदेश प्रवक्ते विश्वास ठाकूर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, रविंद्र पगार, फिरोज मसानी आदी उपस्थित होते. तासाभरानंतर शरद पवार हे मुंबईकडे रवाना झाले. पवार यांचा हा दौरा निवडक पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त गोपनीय ठेवण्यात आला होता शिवाय कुणालाही पुष्पगुच्छ न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
शरद पवार यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:51 IST
पवार यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार या सुद्धा उपस्थित होत्या.
शरद पवार यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन
ठळक मुद्देतासाभरानंतर शरद पवार हे मुंबईकडे रवाना