शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा : किमान तपमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 19:39 IST

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला होता. यामुळे नाशिककर गारठले होते. थंडीच्या ...

ठळक मुद्देकिमान तपमानाचा पारा ११ अंशांपर्यंत वर सरकलागुरुवारी सकाळी वातावरणात आर्द्रताही वाढलेली होती. बहुतांश नागरिकांना सर्दी-पडशाचा त्रास

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला होता. यामुळे नाशिककर गारठले होते. थंडीच्या तीव्रतेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती; मात्र गुरुवारी (दि.१३) थंडीच्या कडाक्यापासून काही अंशी दिलासा मिळाला.गुरुवारी पहाटे थंडीची तीव्रता जाणवली; मात्र दोन दिवसांच्या थंडीच्या तुलनेत काहीसा प्रभाव कमी होता. सकाळी ९ वाजेनंतर थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास पसंती देणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी काही तास आणि संध्याकाळी चाकरमान्यांनी घराकडे परतताना उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून आले. गुरुवारी कमाल तपमान २८.५ इतके नोंदविले गेले. किमान तपमानाचा पारा ११ अंशांपर्यंत वर सरकला. यामुळे थंडीची तीव्रता कमी झालेच्या अनुभव नागरिकांना आला.या हंगामात सर्वाधिक नीचांकी किमान तपमान मंगळवारी (दि.११) ९.४ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. सलग दोन दिवस किमान तपमान इतके राहिल्याने नाशिककर गारठले होते. निफ ाड तालुक्याचा पारा थेट ८.८ अंशांपर्यंत खाली आला होता. बुधवारी किमान तपमानात किंचित बदल होऊन ९.६ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. त्यामुळे थंडीचा कडाका कायम होता. वाढत्या थंडीमुळे रस्त्यांवर पहाटे तसेच संध्याकाळनंतर शेकोट्या पेटू लागल्या होत्या. गोदाकाठालगत उघड्यावर राहणा-या आदिवासी मजुरांच्या वस्तींना शेकोट्यांचा एकमेव आधार होता. कारण नदीकाठ असल्यामुळे बोच-या थंडीचा कडाका या भागात अधिक जाणवत होता.किमान तपमान दोन अंशांनी वाढले असले तरी किमान तपमानात खूप काही फरक गुरुवारी दिसून आला नाही. तसेच दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सकाळी वातावरणात आर्द्रताही वाढलेली होती. सकाळी ८९ टक्के, तर संध्याकाळी ३३ टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात मागील आठवड्यात ८३ टक्के हा आर्द्रतेचा उच्चांक राहिला होता. एकूणच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कायम असल्यामुळे त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. मागील तीन दिवस किमान तपमानाचा पारा घसरल्यामुळे बहुतांश नागरिकांना सर्दी-पडशाचा त्रासही जाणवायला सुरुवात झाली होती. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानNashikनाशिक