शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

 कळवण उपसभापतिपदी काँग्रेसच्या पल्लवी देवरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:32 IST

पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देपंचायत समिती : राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळला

कळवण : पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदाच्या नामनिर्देशनपत्रावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोघा सदस्यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी करून आघाडीचा धर्म पाळला, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांनी काम पाहिले.गेल्या फेब्रुवारी २०१७ मध्ये कळवण पंचायत समितीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होऊन त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून एकहाती सत्ता काबीज केली. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. १४ मार्च २०१७ रोजी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत सभापतिपदी आशा पवार, तर उपसभापतिपदी विजय शिरसाठ यांची निवड झाली होती. सभापती आशा पवार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर, तर उपसभापती विजय शिरसाठ यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली.उपसभापतिपदी काँग्रेसच्या पल्लवी देवरे यांचे एकमेव नामनिर्देशन निर्धारित वेळेत प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांना केली. पल्लवी देवरे यांच्या नामनिर्देशनपत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे केदा ठाकरे व मीनाक्षी चौरे यांची स्वाक्षरी आहे. उपसभापती निवडीप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, कॉँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते यशवंत गवळी, सभापती लालाजी जाधव, नगराध्यक्ष मयूर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार, राष्टÑवादी कॉँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक