शहरासह वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे होऊन रस्त्यांची चाळण झाली आहे. पाऊस पडल्यानंतर तर वसाहतींमध्ये रस्त्याने चालणेही अवघड बनते. शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नियमितपणे साफसफाई होत नाही. वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करावी, शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, बंद पथदीप सुरू करावेे, स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शहरातील जुन्या नगरपालिका कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करून छोट्या-छोट्या कामांसाठी शहरवासीयांचा वेळ व पैसा वाचवावा, व्यापारी संकुलाचा प्रश्न त्वरित सोडवून विस्थापित गाळेधारकांना प्राधान्य द्यावे, मोकाट जनावरांचा, कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, बाजारतळ जागेचा प्रश्न सोडवावा, विंचूर चौफुली येथे सिग्नल बसविण्यात यावा, आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, अखिल भारतीय भटके विमुक्त जाती-जमातीचे अध्यक्ष धीरज परदेशी, नानासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, अमित पटणी, बाळासाहेब पारखे, महेंद्र थोरात, मजीद शेख, अण्णासाहेब पवार, उत्तमराव कोकाटे, इमरान शहा, असद अन्सारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : २७ येवला काँग्रेस
येवला शहरातील समस्यांप्रश्नी पालिका उपमुख्याधिकारी प्रवीणकुमार पाटील यांना निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी. समवेत बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अण्णासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर आदी.
----------------
270821\27nsk_31_27082021_13.jpg
फोटो : २७ येवला काँग्रेस