शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:18 IST

राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले.

नाशिक : राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी राज्य सरकारचे वाभाडे काढणारी वेगवेगळ्या प्रकारची बारा आसने करून उपस्थितांचे मनोरंजन केले.  राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पूर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉँग्रेसने केली होती. केंद्र व राज्य सरकारला योगाची भाषा अधिक कळते त्यामुळे योगाच्या माध्यमातूनच निषेधासन करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या कॉँग्रेसजनांनी अगोदर राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मैदानात आसने करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ‘कर्जमाफी कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’, ‘रोजगार कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’ अशा प्रकारची उपहासात्मक घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शेतकºयांच्या हितासाठी सरकारला सुुबुद्धी मागणारी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, उद्धव पवार, सुरेश मारू, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील आदी सहभागी झाले होते.असे केले निषेधासन...मराठा, धनगर आरक्षण, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यासासन, फसवी कर्जमाफी, शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकाविषयी घोषणासन किंवा गाजरासन; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना क्लीन चिट दिल्याने क्लीनचिटासन; शेतकºयांविषयी अपशब्द काढणाºया मंत्र्यांच्या विरोधात वाचाळासन; महामार्ग कमी न केल्याच्या निषेधार्थ महागाईसन; रोजगार निर्मिती न केल्याच्या प्रश्नावर बेरोजगारासन; अंधभक्तांसाठी भक्तासन; सोशल माध्यमातील पेड ट्रोलाच्या विरोधात ट्रोलासन; खोटे आश्वासन दिल्याने फसवणीसासन; प्रत्येक प्रश्नावर दिल्या जाणाºया धमकीच्या निषेधार्थ धमकीआसन; दुष्काळप्रश्नी सदृश शब्द वापरल्याने अंशत:सन; राफेल प्रकरणात अंबानीला मदत केल्याने राफेलासन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस