मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या खासगीकरणाचा निर्णय शेतकरी, व्यापारी, यंत्रमाग व्यावसायिकांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वीज वितरण कंपनीच्या खासगीकरण करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी, यंत्रमाग कारखानदार, व्यापारी व स्थानिक नागरिकांवर अन्याय होणार आहे. आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी कॉँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, सुकदेव देवरे, वामन बच्छाव, सतीश पगार, अरविंद निकम, कैलास पाटील, युवराज हिरे, पोपटराव बोरसे, दीपक पाटील आदींनी केली आहे.
वीज वितरण कंपनीच्या खासगीकरणाला कॉँग्रेसचा विरोध व्यापारी व स्थानिक नागरिकांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:42 IST