शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसचा जनसंघर्ष विरोधकांशी नव्हे स्वकीयांशीच

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:03 IST

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेविरूद्ध रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेच्या नाशिक जिल्ह्याच्या दौ-याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना काहीशी उभारी मिळाली असली तरी, या यात्रेच्या नियोजनात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांनी हात अखडता घेणे व यात्रेच्या पार्श्वभुमीवर शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी शिष्टमंडळांनी जोरदार फिल्डींग लावणे या दोन्ही बाबी पाहता, जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसला विरोधकांशी नव्हे तर स्वकीयांशीच संघर्ष करण्याची वेळ अजुनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल झाली. पुर्वनियोजीत वेळेनुसार या यात्रेचे काहीसे उशिराने आगमन झाल्यामुळे पुढचे सारे नियोजन ढासळले. यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांना ताटकळावे लागले तर सभाही दोन तास उशिराने सुरू झाल्यामुळे प्रमुख नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. रविवारी रात्री मुक्कामी व सोमवारी यात्रा नाशकात तळ ठोकून मंगळवारी पुढच्या दौºयासाठी रवाना होणार असल्याचे यापुर्वी जाहीर करण्यात आले होते. तथापि, नाशिक जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाच्या एकूणच अवस्थेविषयी अवगत असलेल्या पक्ष नेतृत्वाने नाशिकचा दौरा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शनिवार, रविवार लागून दोन दिवस येत असल्यामुळे व पुढे नवरात्रौत्सव सुरू होत असल्यामुळे ही यात्रा नियोजीत दिवसातच पुर्ण करण्याचा प्रदेशने निर्णय घेतल्यामुळे नाशिकला दोन दिवस यात्रा थांबली तथापि, गंगाघाटावरील जाहीर सभा वगळता या यात्रेचे अस्तित्व शहरात कुठेच जाणवले नाही. त्यामागचे कारणेही अनेक असून, यात्रेच्या नियोजनासाठी येणाºया खर्चाची तजवीज कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात तीन सभा व शहरात एक सभा असल्याने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांवर त्याची जबाबदारी टाकण्यात आली असली तरी, यात्रेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे ज्यांनी ही मोहीम राबविली त्यांच्यावर यात्रेच्या यशस्वीतेची जबाबदारी टाका असा पवित्रा घेवून त्यातून बेबनाव निर्माण झाला. परिणामी यात्रेच्या निमित्ताने विरोधकांशी संघर्ष करण्याऐवजी स्वकीयांशी लढण्याची वेळ स्थानिक नेतृत्वावर आली. आता हा संघर्ष पदाधिकारी बदलापर्यंत कायम राहील.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक