शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात कॉँग्रेसही सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:20 IST

छगन भुजबळांवर अन्याय म्हणजे नाशिकच्या विकासावर अन्याय होत असल्याचा सूर हॉटेल एसएसके येथे झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत उमटला. यावेळी कॉँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात लाखो समर्थकांचा मोर्चा मुंबई येथे काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

नाशिक : छगन भुजबळांवर अन्याय म्हणजे नाशिकच्या विकासावर अन्याय होत असल्याचा सूर हॉटेल एसएसके येथे झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत उमटला. यावेळी कॉँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात लाखो समर्थकांचा मोर्चा मुंबई येथे काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.  या चर्चेप्रसंगी बोलताना पश्चिम विभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले, नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी छगन भुजबळ यांचे योगदान मोठे आहे. भुजबळ नसल्यामुळे नाशिक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. त्यांनी केलेला विकास विरोधकही मान्य करतात. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता झाली असून, भुजबळ समर्थक जोडो अभियानाला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री शोभा बच्छाव म्हणाल्या, छगन भुजबळ यांना डांबून ठेवण्यात आले असतानादेखील भुजबळ यांचे जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा सतत पत्र व्यवहार सुरू असून, त्यांनी अधिवेशनात सर्वांत जास्त तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ होणाºया आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी सांगितले, छगन भुजबळांमध्ये विविध मुद्द्यांवर मोठ्या नेत्यांशी लढण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई सुरू असून, त्यासाठी सर्व समर्थकांनी एकत्र येऊन लढा उभा करावा तसेच मुंबई येथे मोठे आंदोलन उभे करावे, असे शैलेश कुटे यांनी सांगितले. यावेळी आमदार जयवंतराव जाधव, रवींद्र पगार, गजानन शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा केली. याप्रसंगी, नगरसेवक गजानन शेलार, विमलताई पाटील, हेमलता पाटील, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, मधुकर जेजूरकर, लक्ष्मण जायभावे, गोकुळ पिंगळे, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब कर्डक, योगेश कमोद, अंबादास खैरे, मुख्तार शेख, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, कविता कर्डक आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूडबुद्धीने कारवाई छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप वक्त्यांनी बोलताना केला. भुजबळ यांना जामीन मिळू नये, यासाठीही सरकार खोडा घालत असून, सरकारच्या या सूडबुद्धीविरोधी एकत्रित येण्याचे आवाहन वक्त्यांनी केले. समन्वय समितीची बैठक छगन भुजबळ यांच्यावर होणाºया अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच ग्रामीण भागात गल्ली गल्ली ‘अन्याय पे चर्चा’ करून भुजबळ समर्थक जोडो अभियान यशस्वी करण्याचा निर्धार समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला. शहरातील सर्व प्रभागातील समन्वयक तसेच जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यात समन्वयकांच्या नेमणुका करण्यात आल्या. यावेळी सहा विभागात प्रत्येकी १० कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रत्येकी २० बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळcongressकाँग्रेस